नगर : आनंदऋषी जयंतीनिमित्त मिरवणूक | पुढारी

नगर : आनंदऋषी जयंतीनिमित्त मिरवणूक

पाथर्डी तालुका, पुढारी प्रतिनिधी : राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोठी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात तालुक्यातील माणिकदौंडी येथून करण्यात आली. यावेळी सरपंच सिमाशामद पठाण,
उपसरपंच समीर पठाण, गुलाब पठाण, आलमगीर पठाण, गौतम पटवा, रत्न विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम माळी आदी उपस्थित होते.

महाराजांची मिरवणूक दुपारी पाथर्डीत शहरात पोहोचली. चिंचपूर रोड वरील शनी मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी माधवबाबा, मोहन सुडके महाराज, फादर राजेंद्र शेळके, मौलाना शाहरुख, संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी, सचिव सतीश गुगळे, सुरेश कुचेरिया, सुभाष चोरडिया, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, रमेश गोरे, बजरंग घोडके, बंडू पाटील बोरुडे, महेश बोरुडे, मंगल कोकाटे, सिंधूताई साठे, चांद मनियार, संस्थेचे विश्वस्त धरमचंद गुगळे, राजेंद्र मुथा, डॉ. ललित गुगळे, डॉ. सचिन गांधी, डॉ अभय भंडारी, चांदमल देसर्डा, संपतलाल गांधी, प्राचार्य जी. पी. ढाकणे, पुरुषोत्तम इजारे, राजेंद्र गांधी, मुकुंद सुराणा आदी उपस्थित होते.

पाथर्डी : आनंद महाविद्यालय, श्रीतिलोक जैन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने नागरिकांचे डोळ्यांचे पारणे फेडले. (छाया : अमोल कांकरिया)

पाथर्डी शहरातून काढण्यात आलेल्या आनंदऋषी महाराजांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीत समाजबांधवांसह आनंद भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन दिवसीय कार्यक्रमाची सांगता आनंदऋषी महाराज यांच्या जन्मगावी शिराळ चिचोंडी येथे उद्या होणार आहे.
मिरवणुकीत ढोल पथक, कलशधारी मुलींचे पथक, मुलींचे लेझीम पथक, लहान मुलांचे टाळ पथक, टिपरी पथक, बँड पथक यासह विविध पथके मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे मिरवणूक निघाली नव्हती. त्यामुळे चालू वर्षी उत्साह मोठ्या प्रमाणात होता.शहरातील मेनरोडवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. प्रत्येक चौकाचौकात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

मिरवणुकीत महाराजांची प्रतिमा असलेल्या रथाचे नागरिक दर्शन घेत होते. मिरवणुकीत सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. प्राचार्य अशोक दौंड, प्राचार्य डॉ. शेषराव पवार आदींच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी मिरवणुकीचे नियोजन केले. मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत सादर केलेल्या विविध खेळांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी अनेकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

मिरवणुकीत पिण्याच्या पाण्याची सोय

महावीर युवा मंच, जैन बांधव, मुकुंद लोहिया मित्रमंडळ, फिरोज आतार व मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्यांसाठी पिण्याचे पाणी, चॉकलेट, बिस्किटें आदींचे वाटप केले.

Back to top button