नगर : गणोरेतील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य | पुढारी

नगर : गणोरेतील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य

गणोरे, पुढारी वृत्तसेवा : गणोरे गावात व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्ड्यांसह चिखलाचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. या चिखलातून वाट काढत ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे.

गणोरे येथील माध्यमिक विद्यालय ते दंत मंदिर या गावातील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. सर्वत्र चिखल साठला आहे. खड्ड्यातून वाहने जात असताना गढूळ पाणी व चिखल पादचार्‍यांच्या अंगावर उडत आहे.चिखलातून पायी चालणार्‍यांना वाट शोधावी लागत आहे. आंबरे पा. पतसंस्था, सेंट्रल बँक, बसस्थानक चौक इरिगेशन कॉलनी, दत्त मंदिर परिसरात रस्त्याची झालेली वाताहत प्रकर्षाने जाणवत आहे.

पादचार्‍याला अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नाही. दुचाकीस्वार या खड्ड्यात फसतात. अनेकदा अपघात होताना दिसत आहे. सकाळी शेतकरी दुचाकीवरून चार्‍याचे ओझे घेऊन जाताना दुचाकीसह खड्ड्यात पडला. असे अपघात येथे सतत घडत आहेत.

Back to top button