नगर : जिल्हा बँक एटीएम फोडण्याचा प्रयत्न | पुढारी

नगर : जिल्हा बँक एटीएम फोडण्याचा प्रयत्न

बोटा, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यात पठार भागातील साकुर येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.

साकूर येथे अ.नगर जिल्हा बँकेची शाखा आहे. बँकेचे एटीएम आहे. सोमवारी मध्यरात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएमचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. शेटरची एक बाजू चोरट्यांनी तोडली. दुसरी बाजू तोडण्याचा प्रयत्न सुरु असताना आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. एटीएम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने चोरांच्या मागावर घारगाव पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

Back to top button