नगर : एजन्सी देण्याच्या नावाखाली 13 लाख रुपयांना गंडा | पुढारी

नगर : एजन्सी देण्याच्या नावाखाली 13 लाख रुपयांना गंडा

नगर : पुढारी वृत्तसेवा : एजन्सी देण्याचे आमिष दाखवून नगरमधील व्यावसायिकाला 13 लाख 25 हजार रूपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा! शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

प्रणव प्रफुल बांठिया (25, रा. भवानीनगर, बुरूडगाव रस्ता, नगर) यांनी सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 25 एप्रिल ते 17 जून 2022 दरम्यान ही घटना घडली आहे.

नुपूर शर्मानं टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, वादग्रस्त वक्‍तव्यप्रकरणी सुप्रीम कोर्टानं फटकारलं

व्यावसायिक बांठिया यांना मोबाईलवर सोशल मीडियावरील अ‍ॅपमध्ये एक लिंक आली होती. वन प्लस कंपनीची एजन्सी देण्याचे त्यामध्ये नमूद होते. बांठिया यांनी लिंक ओपन करून त्यामध्ये वैयक्तिक माहिती नमूद केली. त्यानंतर बांठिया यांना एका नंबरवरून फोन आला. वन प्लस कंपनीमधून बोलतो असे सांगत, एजन्सी देण्याचे आमिष त्यांना दाखविण्यात आले.

Back to top button