योग्य मार्गदर्शनाने योगाभ्यासाची वाटचाल चांगल्या दिशेने : प्रशिक्षिका सुषमा हंचाटे | पुढारी

योग्य मार्गदर्शनाने योगाभ्यासाची वाटचाल चांगल्या दिशेने : प्रशिक्षिका सुषमा हंचाटे

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा:  जीवनात गुरु असणे गरजेचे असून, योग्य मार्गदर्शन लाभल्यास मनुष्य चांगल्या दिशेने वाटचाल करतो. प्रत्येक व्यक्तीत कोणती ना कोणती गुणवत्ता असते; मात्र ती शोधून तिला बाहेर काढण्याचे काम गुरु करत असल्याचे प्रतिपादन सिद्ध समाधी योगाच्या प्रशिक्षिका सुषमा हंचाटे यांनी व्यक्त केले.

पाथर्डी शहरातील माजी आमदार अप्पासाहेब राजळे सभागृहात सिद्ध समाधी योगातर्फे आयोजिलेल्या योग शिबिराची सांगता करण्यात आली. या शिबिरात आमदार मोनिका राजळे यांच्यासह डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, काकासाहेब शिंदे, रमेश गोरे, बजरंग घोडके, महेश बोरुडे, डॉ. रमेश हंडाळ, डॉ. राजेंद्र खेडकर, अशोक गर्जे, धंनजय बडे, भाऊसाहेब गोरे, डॉ. सुहास उरणकर, अविनाश मंत्री, बाबा गर्जे, संदीप शेवाळे, प्रशांत शेवाळे, भाऊसाहेब गोरे, महेश काटे, सुरेखा गोरे, शारदा हंडाळ, भारती असलकर आदी साधक उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या, शिबिरात सहभाग घेऊन जगण्यातील खरा आनंद कशात आहे याची जाणीव झाली. दैनंदिन जगण्यात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो; मात्र त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असल्याने आपण योग, साधनाच्या माध्यमातून आपली जीवनशैली बदलायला हवी. भारती असलकर यांनी प्रास्ताविक केले. धनंजय बडे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन एकशिंगे यांनी आभार मानले.

Back to top button