नगर : लोणी खुर्द ग्रामसभेत विधवा प्रथा बंदीचा ठराव | पुढारी

नगर : लोणी खुर्द ग्रामसभेत विधवा प्रथा बंदीचा ठराव

लोणी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राला राजर्षी शाहू महाराज यांचा पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे. राजर्षींच्या स्मृती शताब्दीनिमित्त लोणी खुर्द गावात विधवा महिलांना मानसन्मान मिळाला पाहिजे. पतीच्या निधनानंतर कुंकु न पुसता, बांगड्या, मंगळसूत्र हे सौभाग्य अलंकार कायम ठेवत समाजात विधवा मातेला सन्मानाने वागविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगत कृषीभुषण प्रभाताई घोगर यांनी ग्रामसभेत मांडलेला विधवा प्रथा बंदीचा ठराव ग्रामसभेने सर्वानुमते मंजुर केला.

सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी सुटेना

लोणी खुर्द ग्रामसभा (रविवारी) सकाळी 9.30 वा लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामविकास अधिकारी गणेश दुधाळे यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. गावातील रस्ते, बंदिस्त गटार, पथदिवे, घरकुल योजना, दलित वस्ती सुधार योजना, पिण्याचे पाणी, कर वसूली बाबत शासन निर्णय, 14 वा व 15 वा वित्त आयोगातून झालेली व प्रलंबित कामे, यावर चर्चा करण्यात आली.

ग्रामसभेस गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, विस्तार अधिकारी गायकवाड, पो.नि. शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घोरपडे, कामगार तलाठी श्रीमती देवकर, कृषी अधिकारी शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका हजर होत्या.
यावेळी लोणी खुर्दचे मार्गदर्शक एकनाथ पा. घोगरे, उपसरपंच अर्चनाताई आहेर, आबासाहेब आहेर, शांतीनाथ आहेर, राजेंद्र आहेर, श्रीकांत मापारी, अशोक आहेर, रायभान आहेर आदी उपस्थित होते.

जुन्या विधवा प्रथेसारख्या चालीरीती, परंपरा यांना कायमची तिलांजली देऊन आता आपण विज्ञान युगात आहोत, यांचे भान समाजातील प्रत्येकाने ठेवले पाहिजे, याकरिता सर्वांनी समाजात जनजागृती करावी.
                                                                    कृषीभुषण प्रभाताई घोगरे

Back to top button