जळगाव : गहाळ झालेले १२ मोबाईल हस्तगत नागरिकांना केले परत | पुढारी

जळगाव : गहाळ झालेले १२ मोबाईल हस्तगत नागरिकांना केले परत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
फैजपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल चोरीचे प्रकार वाढले होते. या या घटनांचा तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचे सुमारे बारा मोबाईल जप्त केले आहे. मोबाईल हरवलेल्या नागरिकांना पोलिसांच्या हस्ते ते परत करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फैजपूर पोलीस ठाणे हद्दीत यंदा अनेक बरेच मोबाईल गहाळ झालेबाबत संबंधीत मोबाईलधारकांनी तक्रार दाखल केल्या होत्या. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर एसपी अशोक नखाते, सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह यांनी वेळोवेळी मासीक क्राईम मिटींग दरम्यान गहाळ मोबाईल हस्तगत करणेबाबत सूचना दिल्या होत्या. मोबाईल धारकांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे तांत्रीक विश्लेषण करुन सायबर शाखा व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांची मदत घेवून फैजपुर पोलीसांनी एकुण १२ मोबाईल अंदाजे १ लाख रुपये किमतीचे हस्तगत केले. मुळ मोबाईल धारकास गुरुवार (दि.९) रोजी सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या हस्ते परत करण्यात आलेले आहेत.

ही कामगीरी फैजपुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पोलीस उप निरीक्षक विनोद गाभणे, पोलीस हेड कॉन्सटेबल गुलबक्ष तडवी, मदीना तडवी, हर्षा चौधरी, शारदा देवगिरे, जुबेर शेख यांचया पथकाने वाचक शाखेचे गौरव पाटील व स्थानिक गुप्त शाखाचे पोलीस नाईक ईश्वर पाटील यांनी पार पाडली.

Back to top button