सावधान ! राज्यात ‘या’ भागात उष्णतेची लाट सक्रिय; विदर्भात पावसाचा इशारा | पुढारी

सावधान ! राज्यात 'या' भागात उष्णतेची लाट सक्रिय; विदर्भात पावसाचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सोमवारपासून उष्णतेची लाट तीव्र झाली असून, सोलापूर, अकोला, चंद्रपूर, वर्धा या शहरांचे कमाल तापमान 44 अंशांवर गेले होते. दरम्यान, आगामी पाच दिवस विदर्भातच पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा आणि परिसरावर तयार झालेली चक्रीय स्थिती विरून गेली आहे.

आता दक्षिण तामिळनाडूकडे वार्‍यांची स्थिती फिरली आहे. त्यामुळे मराठवाड्यात होणार्‍या पावसाची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे फक्त विदर्भातच पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील पावसाची परिस्थिती निवळल्याने मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील कमाल तापमानात सोमवारी मोठी वाढ झाली. सोलापूरचा पारा यंदाच्या हंगामात प्रथमच 44.4 अंशांवर गेला. सोमवारी विदर्भातील चंद्रपूर 44.2, वाशिम 44, नागपूर 43 अंशांवर गेले होते.

सोमवारचे कमाल तापमान

सोलापूर 44.4, अकोला 44.4, चंद्रपूर 44.2, वर्धा 44, पुणे 40.3, जळगाव 42.2, कोल्हापूर 38, महाबळेश्वर 33.1, मालेगाव 42.8, नाशिक 38, सांगली 41, सातारा 40.7, छत्रपती संभाजीनगर 41.6, परभणी 43.7, नांदेड 42.8, बीड 42, अमरावती 43.6, बुलडाणा 39.6, ब्रह्मपुरी 43.9, गोंदिया 41.3, नागपूर 43, वाशिम 43.2, यवतमाळ 42.5.

हेही वाचा

Back to top button