Lok Sabha Election: 'हातकणंगले'साठी महाविकास आघाडीकडे राजू शेट्टींचा पर्याय?, माजी आमदाराचे नाव चर्चेत | पुढारी

Lok Sabha Election: 'हातकणंगले'साठी महाविकास आघाडीकडे राजू शेट्टींचा पर्याय?, माजी आमदाराचे नाव चर्चेत

सुनील कांबळे

शिरोली एमआयडीसी: पुढारी वृत्तसेवा; आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग येत आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत येण्याचा निर्णय घेण्यास दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे आता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवार देण्याची भूमिका निश्चित करण्याबाबत एक महत्त्वाची बैठक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या निवासस्थानी झाली.  यामध्ये एक अश्वासक चेहरा म्हणून शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नावावर गांभीर्याने चर्चा झाली आहे. (Lok Sabha Election)

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्याप कोणत्याच नावाची चर्चा नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी लोकसभेची निवडणूक भाजपच्या विरोधात लढणार हे त्यांनी जाहीर केले आहे. पण महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत निर्णय घेण्यास ते  दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत येण्यास राजू शेट्टी निर्णय घेत नसतील तर महाविकास आघाडीचा उमेदवार द्यावाच लागेल; अशी ठाम भूमिका आता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे. यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. (Lok Sabha Election)

आज राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे आ. सतेज पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, संजय चौगुले, विजय देवणे यांच्यासह माजी आ. उल्हास पाटील, सत्यजित पाटील सरूडकर, गणपतराव पाटील, आदि  प्रमुख नेत्यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे. महाविकास आघाडीकडून सातत्याने राजू शेट्टींसाठी हात पुढे करून ही त्यांच्याकडून ठोस प्रतिसाद मिळत नाही. लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अस्वस्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता राजू शेट्टींना पर्याय तरीही हातकणंगलेत मतदारसंघासाठी सहाही विधानसभा मतदारसंघात चालेल असा आश्वासक चेहरा पुढे आणण्यासाठी हालचाली गतिमान केल्या. (Lok Sabha Election)

महाविकास आघाडीतून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला देण्याचे  जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे माजी आ. सत्यजित पाटील, डॉ.  सुजित मिणचेकर, उल्हास पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. बैठकीस उपस्थित राहू न शकलेले काँग्रेसचे आ. राजू आवळे, यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी. आ.राजीव आवळे तसेच मदन कारंडे आदींनी या बैठकीत जे काही ठरेल त्याला पाठिंबा दर्शवीला असल्याचे समजते. या बैठकीतून जयंत पाटील यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. (Lok Sabha Election 2024)

सदरच्या बैठकीस राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा. जयंत पाटील, मा. गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील , शिवसेना पक्षाचे उपनेते व जिल्हाप्रमुख मा. संजय पवार , मा. आम. डॉ. सुजित मिणचेकर , मा.आम. सत्यजित पाटील-सरूडकर, मा. आम. उल्हास पाटील , शिवसेना संघटक चंगेजखान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील साहेब, मा. गणपतराव पाटील साहेब,
जिल्हा प्रमुख संजय चौगुले, जिल्हाप्रमुख वैभवराव उगळे, मा. अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव, गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड, मा.जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, रोहित पाटील, नितीन बागे इत्यादी प्रमुख नेते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button