Weather Update : उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा | पुढारी

Weather Update : उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात आगामी दोन दिवसांत नवा पश्चिमी चक्रवात सक्रिय होत आहे, त्यामुळे उत्तर भारतात पाऊस आणि उन्हाचा कडाका राहणार आहे, त्यामुळे देशात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे. दरम्यान शुक्रवारी सोलापूर 38.6 तर पुणे 35 अंशांवर होते. यंदा उत्तर भारतात वारंवार पश्चिमी चक्रवात तयार होत आहे. त्यामुळे मार्च महिना असूनही कमाल तापमान 40 अंशांवर कुठेही गेले नाही. 10 व 12 मार्च रोजी उत्तर भारतात नवे दोन पश्चिमी चक्रवात सक्रिय होत असल्याने काश्मीरसह पूर्वोत्तर भारतात पावसाचे वातावरण राहील. त्यामुळे उष्ण आणि दमट असे वातवरण तयार होऊन प्रचंड उकाडा जाणवणारे वातावरण तयार होत आहे. राज्याचे शुक्रवारचे

कमाल-किमान तापमान :

  • सोलापूर 38.6 (22.4)
  • मुंबई 30.9 (21.4)
  • पुणे 35.6 (15.1)
  • अहमदनगर 34.2 (15.5) जळगाव 34.7 (14.9) कोल्हापूर 35.1 (19.7) महाबळेश्वर 30.5 (17.4) मालेगाव 35.6 (16.8)
  • नाशिक 34.2 (14.9)
  • सांगली 36.4 (17.6)
  • सातारा 35.7 (17.6)
  • सोलापूर 38.6 (19.6)
  • छत्रपती संभाजीनगर 34.8 (18.5), परभणी 37.2 (19.3)
  • नांदेड 36.6 (18.8)
  • चंद्रपूर 37.6 (19)
  • नागपूर 35 (18.2)

हेही वाचा

कोल्हापूर : राजापूर बंधारा झाला पाण्याविना खुला; नदीपात्र बनले कोरडे मैदान

पीक उत्पादकतेत महाराष्ट्र दहाव्यास्थानी!

महापुराचा त्रास कायमचा बंद करू; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Back to top button