भारत गौरवची तिसरी रेल्वे 23 तारखेला मुंबईतून सुटणार | पुढारी

भारत गौरवची तिसरी रेल्वे 23 तारखेला मुंबईतून सुटणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: केंद्र शासनाच्या देखो अपना देश या मोहिमेअंतर्गत असलेली भारत गौरवची तिसरी रेल्वेगाडी येत्या 23 तारखेला मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुटणार आहे. तर 2 जून रोजी पुन्हा ती मुंबईला येणार आहे. या गाडीला आयआरसीटीसीकडून ‘श्री रामेश्वरम-तिरुपती : दक्षिण यात्रा’ असे नाव देण्यात आले असून, ही गाडी मुंबई-म्हैसुर-बेंगळुरू-कन्याकुमारी-तिरूअनंतपुरम-रामेश्वरम-मदुराई-तिरुपती-मुंबई अशी धावेल.

भारत गौरव यात्रेची पहिली गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून 28 एप्रिल रोजी सुटली. ही गाडी ‘पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा’ या नावाने धावली. त्यानंतर दुसरी गाडी 11 मे रोजी पुण्यातून सुटली. ही गाडी ‘महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी यात्रा’ या नावाने उत्तर भारतातील पर्यटन स्थळांसाठी सोडण्यात आली होती. आता ही तिसरी गाडी मुंबईतून सुटणार आहे.

Back to top button