नवाब मलिकांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी जुलैपर्यंत स्थगिती | पुढारी

नवाब मलिकांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी जुलैपर्यंत स्थगिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्‍ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यात २३ फेब्रुवारी २०२२ पासून मलिक अटकेत आहेत. दरम्यान, आरोग्याचे कारणास्‍तव मलिकांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पंरतु,उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील सुनावणीला ६ जुनपर्यंत स्थगिती दिली होती.

मलिकांनी त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.याप्रकरणी आज (दि.१६) मंगळवारी सुनावणी घेत उच्च न्यायालयाला बगल देता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने मलिकांच्या याचिकेला स्थगिती दिली. यादरम्यान उच्च न्यायालय हे प्रकरण हाताळण्यास स्वतंत्र असेल, असे न्या.संजीव खन्ना आणि न्या.एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरलच्या अनुपस्थितीमुळे उच्च न्यायालयाने जामीन अर्जावर स्थगिती दिल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देत मलिकांची बाजू मांडणारे जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली. मलिक आजारी असल्याची बाब देखील सिब्बल यांनी खंडपीठाला सांगितली.दरम्यान, पुढारी आठवड्यात सुनावणीस ईडीची तयारी आहे,असे सरकारच्या वतीने एएसजी एसव्ही राजू यांनी न्यायालयात सांगितले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button