तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आलं, आता जोमाने तयारीला लागा; शरद पवार यांनी दिल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा | पुढारी

तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आलं, आता जोमाने तयारीला लागा; शरद पवार यांनी दिल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन: एमपीएसीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे. आयोगाकडून नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने घेतलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार फेसबुकवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शरद पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ”तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 21 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा आंदोलनस्थळी जात आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांची मागणी योग्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. आंदोलन स्थळावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली होती. आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असं सांगत त्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन देखील केले होते.

Back to top button