राज्यात उद्यापासून ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता | पुढारी

राज्यात उद्यापासून ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानातून नवा पश्चिमी चक्रवात वेगाने भारताकडे येत आहे. हिमालयात बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 23 ते 27 जानेवारीदरम्यान ढगाळ वातावरणासह काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. यामुळे थंडीही कमी राहणार आहे. पाकिस्तानातून हा चक्रवात आगामी 24 ते 48 तासांत भारतात येत आहे.

त्यामुळे हिमालयीन प्रदेशात बर्फवृष्टी अन् पाऊस होईल, तर, 23 ते 27 जानेवारीदरम्यान देशाच्या बहुतांश भागांत ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, दिल्ली, पंजाब, हरियाना, राजस्थान या भागांतील किमान तापमान 3 ते 7 अंशांवर राहून थंडीचा कहर कमी होईल. दरम्यान, याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून, बहुतांश भागांत ढगाळ वातावरण राहणार आहे. काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. किंचित थंडी, पाऊस आणि ढगाळ वातावरण, असे हवामान 23 ते 27 जानेवारीदरम्यान राहणार आहे.

 

Back to top button