फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला | पुढारी

फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला

पुढारी ऑनलाइन डेस्क : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहे. शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट होत आहे. फडणवीस हे नुकतेच शिवतीर्थवर दाखल झाले आहे.

गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्रात नाट्यमय राजकीय घडामोडी होत आहे. शिवसेनेतून शिंदे गट वेगळा पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार स्थापन झाले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसापासून फडणवीस हे राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज फडणवीस राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थवर पोहोचले आहे.

फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या भेटीत नेमके काय होणार राज ठाकरे शिंदे गट आणि भाजप यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार का पुढील राज’नीती’ काय असेल हे पाहणे औत्सुक्याचा विषय ठरत आहे.

हेही वाचा:

Back to top button