नगर : यंदा जिल्ह्यात 1 लाख 35 हजार युवा बजावणार पहिल्या वहिल्या मतदानाचा हक्क | पुढारी

नगर : यंदा जिल्ह्यात 1 लाख 35 हजार युवा बजावणार पहिल्या वहिल्या मतदानाचा हक्क

नगर : पुढारी वृत्तसेवा

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात नव्याने 1 लाख 35 हजार 436 नवमतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मार्च 2022 अखेरच्या आकडेवारीनुसार नवीन मतदारांमध्ये युवक 64 हजार 297, तर युवती 71 हजार 139 आहेत. हा वाढलेला टक्का आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरणारा असणार आहे.

Janhvi Kapoor : हॉटनेस ओव्हरलोडेड🥵; जान्हवीचा बॅकलेस ड्रेसमध्ये जलवा

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेला विशेष महत्व आहे. त्यामुळेच 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी राज्य निवडणूक विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. युवकांमध्ये जनजागृती केली जात आहे, शाळा, महा-विद्यालयात शिबीरे सुरू आहेत. त्यातून मतदार यादीतील युवकांची संख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे.

2019 ला 34 लाख मतदार…

जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी 12 विधानसभा मतदार संघात 33 लाख 93 हजार 87 मतदार संख्या होती. यामध्ये पुरुष 17 लाख 71 हजार 281, तर महिला मतदारांची संख्या ही 16 लाख 21 हजार 671 इतकी असल्याचे समोर आले होते.

सध्या 35 लाखांचा आकडा

विधानसभा निवडणुकीनंतर दोन वर्षांत मतदार नोंदणीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. यामध्ये मतदारांचा आकडा वाढताना तो 35 लाख 28 हजार 542 इथपर्यंत पोहोचला आहे. तो आणखी वाढत जाणार आहे. यात, पुरुष मतदार 18 लाख 35 हजार, तर महिला 16 लाख 92 हजार 810 आहेत.  दरम्यान, हे नवीन मतदार आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपला पहिला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. त्यामुळे ते या निवडणुकीसाठी उत्सुक आहेत.

नवमतदारांत महिलांचा टक्का वाढला

दोन वर्षांच्या कालावधीत 64 हजार 297 इतकी युवक मतदारांची नवीन नोंदणी झालेले आहे, तर 71 हजार 139 इतक्या महिलांची नवीन मतदार म्हणून नोंद झालेली आहे. त्यामुळे नव्या मतदानात पुरुषांच्या तुलनेत 6842 मतदान हे महिलांचे वाढल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

  • 2022

पुरुष मतदार
18,35,578

महिला मतदार
16,92,810

  • 2019

पुरुष मतदार
17,71,281

महिला मतदार
16,21,671

  • वाढलेले मतदार

64297 युवक मतदार
71139 युवती मतदार

  • विधानसभा 2019 – 2022
  • अकोले 2,50,723 2,53,822
  • संगमनेर 2,64,158 2,73,474
  • शिर्डी 2,57,096 2,66,942
  • कोपरगाव 2,56,868 2,66,693
  • श्रीरामपूर 2,79,576 2,94,034
  • नेवासा 2,53,129 2,67,918
  • शेवगाव 3,33,422 3,48,562
  • राहुरी 2,84,396 2,97,641
  • पारनेर 3,13,473 3,28,606
  • नगर 2,80,500 2,89,035
  • श्रीगोंदा 3,07,334 3,13,244
  • कर्जत 3,12,412 3,28,571
    एकूण 33,93,087 35,28,542

हे ही वाचा : 

धुळे नजीक मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात ; 3 जण ठार, 11 गंभीर जखमी

हिंगोली : कॅनोलमध्ये आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह ; प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय

देशात रोजगार निर्मितीत बंगळूर अव्वल, पाठोपाठ दिल्ली, मुंबईचा क्रमांक

Back to top button