उजनीत येणार्‍या पाणलोट क्षेत्रात दिवसात 663 मिलिमीटर पाऊस | पुढारी

उजनीत येणार्‍या पाणलोट क्षेत्रात दिवसात 663 मिलिमीटर पाऊस

बेंबळे : पुढारी वृत्तसेवा उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने मागील दोन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. पुण्यापासून उजनी धरणात विविध धरणांतून पाणी येते. त्या क्षेत्रात मंगळवारी (दि. 5) दिवसभरात तब्बल 663 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे उजनी धरणात येणार्‍या पाण्यात वाढ झाली असून, पाणीसाठा मायनस 12 टक्क्यांवर आला आहे. दरम्यान, आषाढी वारीसाठी धरणातून विसर्ग सुरूच आहे. दुसरीकडे उजनी धरण उणेमधून अधिक स्थितीमध्ये कधी येते, याकडे सर्वांचे लागले आहे.

गेल्यावर्षीची चांगली पाण्याची परिस्थिती असल्याने जिल्ह्याला पाणीटंचाई जाणवली नाही. पण चालूवर्षी जूनमध्ये लांबलेल्या मान्सूनमुळे पेरण्याही लांबणीवर गेल्या, काहींनी केलेल्या पेरण्या वाया गेल्या. यामुळे शेतकरी हैराण होते. त्यात जुलै महिन्यात सुरुवातीलाच उजनी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची हजेरी लावून दिलासा दिला. एक जून ते एक जून ते 30 जूनपर्यंत उजनीच्या पाणलोट क्षेत्रात केवळ सहा मिलिमीटर पाऊस झाला होता.

सध्या उजनीचा पाणीसाठा मायनस 12% मध्ये आहे. त्याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष धरणाच्या पाणीसाठ्याकडे लागलेले आहे. जिल्ह्याचे भविष्य याच उजनी धरणावर अवलंबून आहे.जिल्ह्याचे अर्थकारण, समाजकारण,राजकारण ज्या उजनी धरणावर अवलंबून आहे .जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांचे लक्ष उजनीतील पाणीसाठ्यावर लागले आहे.पण पुण्यापासून उजनी धरणात विविध धरणांमधून होणार्‍या पाणी विसर्गामुळे पातळी वाढू लागली आहे.

पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून एका दिवसात झालेल्या पावसाची नोंद 663 मि. मि. इतकी आहे. यामुळे बंडगार्डन व दौंडमधून विसर्ग उजनीत येण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे उजनीवर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांसाठी अशादायक वृत्त आहे. सध्या उजनी धरणातून पंढरपूर आषाढी एकादशी साठी मुख्य कालव्याद्वारे 1000 क्यूसेक भीमा नदीतून गाळ मोरे द्वारे 1000 क्यूसेक बोगदा 150 क्यूसेक अशा रीतीने सध्याला उजनी धरणातून 2150 क्यूसेक पाणी सोडले जात आहे.

उजनी धरणातील पाणीपातळी

एकूण पाणीपातळी           490.065 मीटर
एकूण पाणीसाठा             1620.74 द.ल.घ.मी.
उपयुक्त साठा- वजा        182.07 द.ल.घ.मी.
एकूण पाणीसाठा             57.23 टी.एम.सी.
उपयुक्त साठा                 6.43 टी.एम.सी.
टक्केवारी                       -12 टक्के

Back to top button