सोलापूर : २२ वर्षीय विवाहितेची चिमुकल्यासह पेटवून घेऊन आत्महत्या | पुढारी

सोलापूर : २२ वर्षीय विवाहितेची चिमुकल्यासह पेटवून घेऊन आत्महत्या

करमाळा; पुढारी वृत्तसेवा : करमाळा तालुक्यातील (सोलापूर )गौंडरे येथे एका विवाहितेने तीन वर्षीय चिमुकल्या मुलासह पेटवून घेऊन आत्महत्या केली. सोलापूर उघडकीस आलेल्या या धक्कादायक प्रकाराचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. संध्या दत्तात्रय आंबारे ( वय २२ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर शंभू दत्तात्रय आंबारे (वय ३ वर्षे) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. आज (दि.28 जून) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असणाऱ्या शेतात ही घटना घडली.

गौडंरे परिसरात हळहळ व्यक्त

संध्या आंबारे या विवाहितेने चिमुकल्या मुलासह आत्महत्या केली. यावेळी मयत विवाहितेचा सासरा अंगद लिंबा आंबारे हे विवाहितेच्या अंगणवाडी येथे शिकत असलेल्या राजवीर दत्तात्रय आंबारे (वय ४.५ वर्षे ) या मुलाला शाळेतुन आणण्यासाठी गेले होते. विवाहितेची सासू मुलीकडे पंढरपूर येथे गेली होती तर विवाहितेचा पती दत्तात्रय अंगद आंबारे (वय २५ वर्षे) हा गवंडी काम करत असून तो पाथुर्डी येथे कामासाठी गेला होता.

घरी कोणी नसल्याचे पाहून केली आत्महत्या

दत्तात्रय अंगद आंबारे यांना दोन मुले आहेत. त्यातील एक मोठा मुलगा राजवीर हा गावातील अंगणवाडीत जातो तर दुसरा लहान मुलगा शंभू हा लहान असल्याने आईसह घरीच होता. आज दुपारी घरी कोणी नसल्याचे पाहून संध्या दत्तात्रय आंबारे यांनी पोटच्या तीन वर्षीय मुलासह पेटवून घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकाराने गौंडरे गावात शोककळा पसरली आहे.

या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. घटनेची माहिती समजताच करमाळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. मयताची पाहणी व पंचनामा करून दोघांचे शव शवविच्छेदनासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले .

नेर्ले तालुका करमाळा येथे जबरी चोरी प्रकरणी तपासासाठी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह घटनास्थळी भेट दिली होती. यावेळी गौंडरे येथील आत्महत्येची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालो. एक विवाहितेचा लहान मुलासह शंभर टक्के जळालेल्या अवस्थेत घरापासून थोड्या अंतरावरील शेतात मृतदेह आढळून आला. यावेळी त्यांचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होणार आहे. सध्या करमाळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
– डॅा.विशाल हिरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, करमाळा

हेही वाचा

Back to top button