

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :
काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके, असे गुवाहाटीचे रसभरीत वर्णन सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मतदारसंघातील आपल्या मित्राशी फोनवर बोलताना केले होते. या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे.शहाजीबापू पाटील यांच्या संभाषणाची ऑडियाे क्लिप सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे.
महराष्ट्रापासून दूर असले तरीही मनाने महाराष्ट्रात असलेल्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबत असणार्या सर्व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाक्याची भुरळ पडली नसती तरच नवल होतं. आज सकाळी सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता त्यांनी शहाजीबापूंच मनापासून कौतुक केलं.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांना त्याचे सुपरहिट ठरलेले काय ती झाडी… डोंगार… हाटील… एकदम ओके हे वाक्य पुन्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली. शहाजीबापू यांनीही विनंतीचा मान राखत पुन्हा एकदा हे वाक्य रिपीट केले. हे वाक्य किती व्हायरल झालय आणि त्याची लोकांनी गाणी तयार केलीत, हे एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापू यांना दाखवले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित बंडखाेर आमदारांनी त्यांच्या वाक्याला मन:पूर्वक दाद दिली आणि एकच हशा पिकला.
हेही वाचलंत का ?