सोलापूर : उजनी धरण आले प्लसमध्ये; मायनसचा विळखा निसटला | पुढारी

सोलापूर : उजनी धरण आले प्लसमध्ये; मायनसचा विळखा निसटला

बेंबळे; पुढारी वृत्तसेवा : उजणी धरण : नाही नाही म्हणता शेवटच्या टप्प्यात संथ गतीने का होईना उजनी धरण गुरुवार 22 जुलै रोजी रात्री 10 वाजता  मायनसचा विळखा तोडून प्लसमध्ये प्रवेश केला.

विशेष म्हणजे गतवर्षी प्रमाणे जुलै महिन्यात उजनी ने प्लसमध्ये प्रवेश केल्याने उजनी धरण 100 टक्के भरण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत.

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात  पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्यांदाच चालू पावसाळी हंगामात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या धरणसाखळीत काल एका दिवसात क्षेत्रात 1940 मि.मी.  तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

उजणी धरण : पाणलोट भागात मोठा पाऊस

मात्र उजनी धरण मध्ये समाधानकारक वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांत निर्माण झालेले चिंतेचे वातावरण निवळु लागले आहे. तर वरील 19 धरणाच्या पाणलोट भागात मोठा पाऊस चालू झाल्याने त्यापैकी 4 धरणातून 13258 क्युसेक चा विसर्ग चालू केला आहे. वडज, 3979
कलमोडी 5979, कासारसाई 3300, असा चालू असून त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वसाधारणपणे उजनी धरण प्लसमध्ये येण्यासाठी ऑगष्ट महिना उजाडतो. 2016 मध्ये उजनी 5 ऑगष्ट मध्ये तर 2017 ला जुलै 20 ला प्लसमध्ये तर 2018 मध्येही 17 जुलै ला तर 2019 ला 29 जुलैला 2020 ला 17 जुलै प्लसमध्ये आले होते. यावर्षीही जुलै मध्ये मायनसमधून प्लसमध्ये येण्याची वेळ सलग सहा वर्षे साधली आहे.

उजनीचे अधीक्षक अभियंता व टीम व उजनी प्रशासनाकडून काटेकोरपणे झालेल्या नियोजनामुळे उजनी धरणाची पाणी पातळी जास्त खालावली नाही. अशातच पर्जन्यवृष्टी हंगामाच्या सुरूवातीला कमी जास्त का होईना पण समाधानकारक झाल्यामुळे यंदा उजनी धरण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जीवंत साठ्यात प्रवेश करणार आहे.

पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक व सामान्य नागरिकांसाठी उजनी धरण अत्यंत महत्वाचे आहे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ही १२३ टीएमसी आहे. त्यापैकी ६३.६५ टीएमसी पाणीसाठी मृत पाणीसाठा आहे तर ५३.५७ टीएमसी पाणीसाठा उपयुक्ततर जादा 10 टक्के चे ६ टीएमसी आहे. चालू वर्षी पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असल्यामुळे पाणलोट क्षेत्रातून उजनीतून सिंचनासाठी होणारा पाणी उपसा बंद आहे.

उजणी धरण : दौंड येथुन 9704 क्युसेक वेगाने पाणी

दौंड येथुन उजनी धरणामध्ये 9704 क्युसेक वेगाने पाणी येत आहे. यावर्षी उजनीच्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे केल्याने उजनी मायनस पातळी -22.42 टक्के पर्यंत खाली आले होते. त्यामुळे उजनीचा मायनसचा विळखा लवकर निसटणार हे नक्की झाले होते. त्यामुळेच केवळ उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे उजनी मायनसमधून प्लसमध्ये आले आहे.

गतवर्षीपेक्षा 5 दिवस उशिरा. पण आतापर्यंत उजनीवरील 19 धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी उजनीला फायदा होईल, असा पाऊस सुरु झालेला नव्हता. परंतु काल पासून उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे सध्या उजनीत येणाऱ्या विसर्गात वाढ होताना दिसत आहे. परंतु पावसाचा जोर वाढल्याने आता मोठा विसर्ग उजनीत येणार हे नक्की.

तर उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी वाढवलेले पाईप, मोटारी, केबल पाण्यात जाऊ नये यासाठी त्या बाजुला करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ चालल्याचे चित्र उजनी काठावर दिसून येत आहे.

सध्या उजनी धरणातील  पाणीपातळी

दुपारपर्यंतची स्थिती

एकूण पाणीपातळी –   ४९१.०३० मीटर

एकूण पाणीसाठा  –     १८०१.  दलघमी
उपयुक्त  साठा   –   –  (उणे) १०.४५ दलघमी
एकुण पाणीसाठा  –    ६२.६२ टी.एम.सी.
उपयुक्त साठा    –  –  (उणे)०.०६८ टी.एम.सी.
टक्केवारी       –    – (उणे) ०.१० टक्के
पर्जन्यमान –      ०/३०० मि.मी.

आवक

दौंड – ९७०४ क्युसेक

विसर्ग

नदी     – बंद
कालवा – बंद
बोगदा – बंद

निरा खोर्‍यातील धरणाच्या पाणी साठ्यात २४ तासात २.८८ टीएमसी वाढ

निरा खोऱ्यातील निरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून निरा-देवघर धरणावरती मागील २४ तासात विक्रमी २४९ मी.मी पाऊसाची नोंद झाली आहे. खोर्‍यातील गुंजवणी, भाटघर, व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्यामुळे या सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ सुरू आहे. बुधवार २१ जुलै स.६ ते गुरुवार २२ जुलै स.६ पर्यंत या तिन्ही धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा २०.५३ टीएमसी एवढा झालेला असून एकूण सरासरी टक्केवारी ४२.५१ टक्के एवढी आहे.

हे पाहा :

गायी पाळणाऱ्या मुंग्यांची गोष्ट

Back to top button