पोलादपूर मध्ये पावसाचे थैमान! सुरूच सावित्री नदीचे पाणी शहरात शिरले ! | पुढारी

पोलादपूर मध्ये पावसाचे थैमान! सुरूच सावित्री नदीचे पाणी शहरात शिरले !

महाड पुढारी वृत्तसेवा : महाड पोलादपूरमध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून पावसाने थैमान सुरु आहे. सावित्री नदीचे पाणी पातळी धोक्याची ओलांडून भोई घाटामार्गे बाजारपेठेमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास शिरले. बाजारपेठेतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

दरम्यान महाड शहराला जोडणाऱ्या विविध मार्गांवर पाणी आल्याने ग्रामीण भागात जाणाऱ्या चाकरमान्यांची सायंकाळी पंचाईत झाल्याचे दिसून येत आहे. महाडपालिका प्रशासन व तहसील यंत्रणेमार्फत शहरातील व तालुक्यातील जनतेला सावधानतेचे इशारे देण्यात येत आहे. लोकांनी अत्यावश्यक परिस्थितीमध्येच बाहेर पडावे असे निर्देश दिले आहेत .

महाबळेश्वर परिसरामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तास तुफान पडणाऱ्या पावसाने पोलादपूर महाड परिसरातील नदीच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली. महाड पोलादपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातही होणाऱ्या तुफानी पावसाने यामध्ये भर घातली आहे. दरम्यान मांघरूण परिसरातील एका शेतकऱ्यांच्या काही म्हैशी पाण्यात वाहून गेल्याचे वृत्त हाती आले. याची आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.

महाड शहरालगत गांधारी नाका दस्तुरी नाका तसेच शेडाव व बिरवाडी परिसरामध्ये रस्त्यावर पाणी आल्याने गावातून ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे.

महाड पालिकेने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना दोन दिवसांपूर्वीच सुरक्षितस्थळी हलविले आहे. हे वृत्त लिहीत असताना पावसाची संततधार सुरूच असून पुढील दोन दिवसाच्या शासनाने वर्तवलेल्या अंदाजाच्या आढावा घेता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

खोपोली शहरात व खालापुरात अनेकदा गावात पाणी घुसले नदी उपनद्यांची पातळी ओलांडली.

अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून कर्जत खोपोली केलवली जवळ ट्रॅक खचला असून खोपोली शहरात बाजरपेठेत भिंत कोसली असली तरी जीवित हानी नाही मात्र दोन आदिवासी बांधव जखमी आहेत मदत यंत्रणा रात्रभर मेहनत घेत आहे

हे ही वाचलत का :

हे पाहा :

गायी पाळणाऱ्या मुंग्यांची गोष्ट

Back to top button