जळगाव जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमबजावणी; आतापर्यंत 24 लाखाहून अधिक मद्य जप्त | पुढारी

जळगाव जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमबजावणी; आतापर्यंत 24 लाखाहून अधिक मद्य जप्त

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही करणे सुरू केले असून त्यात शस्त्र जप्ती, रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू याबाबतची तपासणी सुरू केली आहे.

शस्त्र जप्ती
जिल्ह्यात एकूण १३२३ परवानाधारक शस्त्र असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश जारी झाल्यानंतर आज पर्यंत ९८५ शस्त्र विविध पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. तर ११५ शस्त्रधारकांना सूट देण्यात आली आहे. चार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तर दोन परवाने रद्द करण्यात आले आहेत. अद्याप पर्यंत २७ शस्त्र जमा होणे बाकी आहे. सीआरपीसीच्या प्रतिबंधात्मक कलमाअंतर्गत आतापर्यंत ४७०० प्रकरणे दाखल करण्यात आले आहेत. तर ३२८७ जणांना अटक करण्यात आली आहे.

मद्य संदर्भातील कार्यवाही
आचासंहिता (दि.१६ मार्च पासून) कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपशिल असा..
एकूण गुन्हे – 136
जप्त मुद्देमाल (लिटर)- 49,252.19
जप्त मुद्देमाल किंमत (रू) – 24,08,865

सी-व्हिजिल
जळगाव जिल्ह्यात एकूण ६६ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी सत्यता पडताळून १२ तक्रारी वगळण्यात आल्या तर ५४ तक्रारींवर विहित काळात कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तिथला फोटो काढावेत आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे, ती तक्रार प्राप्त होताच विहित कालावधीत त्यावर कार्यवाही होते.

मीडिया
अद्याप पर्यंत मीडिया सेलकडे एकूण दोन तक्रारी प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी दोन्ही तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

हेही वाचा:

Back to top button