जळगाव : दहा वर्ष कॅबिनेट मंत्री होतात त्यावेळेस झोपा काढल्या का? : उन्मेश पाटील | पुढारी

जळगाव : दहा वर्ष कॅबिनेट मंत्री होतात त्यावेळेस झोपा काढल्या का? : उन्मेश पाटील

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
दहा वर्ष कॅबिनेट मंत्री होतात त्यावेळेस झोपा काढल्या का? अशी टीका उन्मेश पाटलांनी नाव न घेता ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीकास्त्र सोडले. व्यक्तीदोषाचे राजकारण कधीच केलेलं नाही जर तुम्ही चुकीचे काम करणार तर तुम्हालाही सोडणार नाही असा इशारा पत्रकार परिषदेमधून ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी पक्ष बदलल्यानंतर दिला.

केळी पीकविम्याबाबत अर्ज राज्यस्तरीय समितीने नाकारल्याने प्रलंबित असलेले १० हजार ६१९ शेतकरी आणि अर्ज प्रलंबित ठेवण्यात आलेले ११ हजार ३६० शेतकरी, यांच्या अर्जांची सद्यःस्थिती, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान, पोखरा योजना अशा शेतकर्‍यांशी निगडित विविध मुद्यांवर भाष्य केले.

लोकसभेत उमेदवारी कापल्याने भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात सामील झालेल्या उन्मेश पाटलांनी आता जळगावातील भाजपचे बडे नेते गिरीश महाजनांना टार्गेट केलं आहे. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये तुम्ही झोपा काढत आहात का? कॅबिनेट मंत्री असताना पोखरा योजनेमध्ये जळगाव जिल्ह्यातले एक गाव घेतलं नाही, लाज वाटत नाही का? एखाद्या माणसाने तोंड दाखवलं नसतं असं म्हणत ठाकरे गटाच्या उन्मेश पाटलांनी मंत्री गिरीश महाजनांवर सडकून टीका केली. तुम्ही चुकीचे काम करणार तर तुम्हालाही सोडणार नाही जामनेरबाहेरही निघू देणार नाही असं म्हणत उन्मेश पाटलांनी गिरीश महाजनांना पत्रकार परिषदेतून थेट इशारा दिला आहे.

कुठेतरी बगल देणे गरजचे आहे. कुठपर्यंत खालच्या स्थराचे राजकारण करायचे. लोकसभा व येणाऱ्या विधानसभा हे क्रांतीचे वर्ष आहे. त्यामुळेच हातात मशाल घेतलेली आहे. जर तुम्ही चुकीचे काम करणार तर तुम्हाला सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला.  जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी ग्रामविकासमंत्री यांनी काहीएक केले नाही. मंत्रिमंडळ बैठकांत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर कधीच बोलले नाहीत. ते बैठकांत झोपा काढतात. शेतकऱ्यांच्या, ठेवीदारांच्या, दूध उत्पादकांच्या व जिल्हा बँकेचा सचिवांच्या ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या बाजूने मी उभा राहणार असल्याचे पाटील म्हणाले. तसेच चांगले काम केले तर कौतुक करेल असेही ते म्हणाले

आपल्या शेजारील जिल्ह्यातील दादा भुसे यांनी पोखरा योजनेमध्ये संपूर्ण तालुका टाकून घेतला. मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने काही एक बाेलले नाही असे ते म्हणाले. कोणत्या तोंडाने तुम्ही शेतकऱ्यांसमोर जात आहेत, कोणत्या तोंडाने मते मागत आहात, पोखरा योजनेत जिल्ह्यातील एकही गाव नाही, ट्रॅक्टरला अनुदान नाही, ठिबकला अनुदान नाही, काय तुम्ही करत आहात? शेतकऱ्यांसाठी हे पोकळ वायदे आहेत त्यामुळे ते आता पेटले आहेत. या संदर्भात लवकरच मतपेटीतून सर्व दिसणारच आहे. ऑडिट करा, चौकशा करा. त्यांनी आता तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आता मी अधिक खोलात गेलो तर त्यांना पळता भुई थोडी होईल आणि त्यांना जामनेरच्या बाहेर पडू देणार नाही, असा इशारा उन्मेष पाटील यांनी दिला आहे. जिल्हा बँकेत फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता आणल्याचे श्रेय महाजन घेत आहेत. मग त्यांनी आता शेतकर्‍यांच्या कर्जाचा आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या गटसचिवांचा जो प्रश्‍न निर्माण झाला आहे, त्याकडे महाजनांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा:

Back to top button