‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ : बच्चन यांच्याकडून विनोदवीरांना कौतुकाची थाप

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ : बच्चन यांच्याकडून विनोदवीरांना कौतुकाची थाप

मुंबई; पुढारी ऑनलाईन : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या विनोदवीरांना महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून कौतुकाची थाप मिळालीय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या कलाकारांनी फिल्मसिटी इथं जाऊन अमिताभ बच्चन यांची भेट घेतली.

यावेळी अमिताभ यांनी सर्व हास्यवीरांचं आणि हास्यजत्रेचं कौतुक केलं. 'तुम्ही लोकांना हसवण्याचं अतिशय कठीण असं काम करताहात. ते सतत असंच करत राहा', असं ते म्हणाले. ते स्वतःही हास्यजत्रा पाहत असल्याचं आणि आपल्या कुटुंबालाही हास्यजत्रेबद्दल सांगत असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं.

सर्वांची आवडती हास्यजत्रा रविवारी भेटीस आल्यावर अनेक प्रेक्षकांनी ती पुन्हा चार दिवस व्हावी. अशी मागणी केली होती. त्यांचा हास्याचा डोस आठवड्यातून चार दिवस मिळावा. अशीही मागणी केली होती.

प्रेक्षकांच्या मागणीचा मान राखला गेला. आता २० सप्टेंबरपासून, सोमवार ते गुरुवार रात्री ९ वा. असे चार दिवस हा कार्यक्रम भेटीला येणार आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता असे दिग्गज हास्यवीर प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यास सज्ज आहेत.

आता हसण्याचे वार होणार आठवड्यातून चार, पाहायला विसरू नका. सोमवार ते गुरुवार, रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news