बीड : सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला

बीड : सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला

युसूफ वडगांव ; पुढारी वृत्‍तसेवा : केज तालुक्यातील युसूफवडगांव येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे हाता तोंडाशी काढायला आलेले सोयाबीन पिक पाण्यात गेले. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने याचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सोयाबीन नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी मान्सूनच्या पावसाने लवकरच हजेरी लावली होती. त्यामुळे याही वर्षी मृग नक्षत्रात जवळपास सगळ्यांच्या पेरण्या झाल्याने पाऊसकाळ चांगला राहुन उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा होती, पण शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.

त्यामुळे नद्या नाल्यांना पूर आला. शेतातही सर्वत्र पाणीच पाणी झाले. यामुळे सोयाबीनचे सर्व पिक पाण्यात गेले. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

त्यातच आधी कोरोनाचे संकट उरावर असताना या अस्मानी सुल्तानी संकटामुळे शेतकऱ्यांवर आघात केला आहे. यामुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बघडणार आहे.

त्यातच सध्या सोयाबीन काढणीचे दिवस असुन, सोयाबीन काढावे तरी पंचाईत आणि नाही काढावे तरी पंचाईत अशी अवस्था काही शेतकरी बांधवांची झाली आहे. शासनाने या नुकसानीचे तातडीने पंचमाने करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांमधून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news