Neuralink : केवळ विचाराने कॉम्प्युटर चालेल अन् अंध व्यक्तीही पाहू शकेल : एलन मस्क

Neuralink : केवळ विचाराने कॉम्प्युटर चालेल अन् अंध व्यक्तीही पाहू शकेल : एलन मस्क

वॉशिंग्टन : 'टेस्ला', 'स्पेसएक्स' आणि 'न्यूरालिंक'चे सर्वेसर्वा (Neuralink) एलन मस्क यांनी म्हटले आहे की भविष्यात एका चिपच्या सहाय्याने अंध व्यक्तीही पाहू शकेल, अर्धांगवायू झालेली व्यक्ती केवळ मनात विचार आणताच मोबाईल व कॉम्प्युटर ऑपरेट करू शकेल. मस्क यांनी 'न्यूरालिंक'च्या कॅलिफोर्नियामधील मुख्यालयात 'शो अँड टेल' कार्यक्रम सादर केला आणि त्यामध्ये मानवी मेंदूत बसवल्या जाणार्‍या चिपची व संबंधित उपकरणाच्या विकासातील प्रगतीची माहिती दिली. सहा महिन्यांनंतर अशी चिप मानवावरील चाचणीसाठी उपलब्ध होईल.

(Neuralink) मस्क यांनी सांगितले की त्यांच्या ब्रेन चिप इंटरफेस स्टार्टअपचे वायरलेस उपकरण सहा महिन्यांमध्ये मानवावरील चाचणीसाठी उपलब्ध होईल. त्यासाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडे दस्तावेज जमा करण्यात आले आहेत. मस्क यांनी सहा वर्षांपूर्वी ब्रेन कंट्रोल इंटरफेसेस स्टार्टअपची स्थापना केली होती आणि दोन वर्षांपूर्वी आपल्या इम्प्लँटेशन रोबोलाही सादर केले होते.

कार्यक्रमात मस्क (Neuralink) यांनी जॉयस्टिकच्या वापराशिवाय एक माकड पिनबॉल खेळत असलेला व्हिडीओही दाखवला. टेलिपथीच्या माध्यमातून या माकडाने टायपिंगही केले. 'न्यूरालिंक'च्या टीमने त्यांच्या सर्जिकल रोबोचाही डेमो दाखवला. हा रोबो कशाप्रकारे एखादी शस्त्रक्रिया करू शकतो हे दाखवण्यात आले.

'न्यूरालिंक' (Neuralink) ने नाण्याच्या आकाराचे एक उपकरण बनवले आहे ज्याला 'लिंक' असे नाव देण्यात आले आहे. हे उपकरण कॉम्प्युटर, मोबाईल फोन किंवा अन्य उपकरणाला ब्रेन अ‍ॅक्टिव्हिटी (न्यूरल इम्पल्स) शी थेट नियंत्रित करण्यास सक्षम करते. 'न्यूरालिंक'ने म्हटले आहे की आम्ही पूर्णपणे इम्प्लँटेबल (प्रत्यारोपित करता येण्यासारखे) कॉस्मेटिक रूपाने अद़ृश्य ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस डिझाईन करीत आहोत जेणेकरून आपण कुठेही गेलो तरी कॉम्प्युटर किंवा मोबाईल डिव्हाईसला नियंत्रित करू. मायक्रोन-स्केल थ्रेडस्ना मेंदूच्या अशा भागात सोडले जाईल जो हालचालींना नियंत्रित करतो.

प्रत्येक थ्रेडमध्ये अनेक इलेक्ट्रोड असतात आणि त्यांना 'लिंक' (Neuralink) नावाच्या इम्प्लँटशी जोडतात. हे धागे इतके सूक्ष्म आणि लवचिक असतात की त्यांना मानवी हातांनी सोडता येणार नाही. त्यासाठी कंपनीने एक रोबोटिक प्रणाली विकसित केली आहे जी थ्रेडला मजबुतीने आणि कुशलतेने प्रत्यारोपित करील. तसेच 'न्यूरालिंक'ने एक अ‍ॅपही डिझाईन केले आहे जेणेकरून मेंदूच्या क्रिया थेट आपल्या कीबोर्ड आणि माऊसला केवळ विचाराने नियंत्रित करतील. या डिव्हाईसला चार्ज करण्याचीही गरज असेल. त्यासाठी कॉम्पॅक्ट इंडक्टिव्ह चार्जर डिझाईन करण्यात आला आहे. तो बॅटरीला बाहेरून चार्ज करण्यासाठी वायरलेस पद्धतीने इम्प्लँटशी जोडला जातो.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news