Bipasha Basu : बिपाशाच्या बा‍ळाची पहिली झलक समोर!

bipasha-karan
bipasha-karan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू सध्या मातृत्त्वाचा आनंद घेत आहे. (Bipasha Basu ) तिने आपल्या बाळाची झलक दाखवली (Bipasha Basu) असून एक सुंदर फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या बाळासोबत दिसत आहे. शिवाय सोबत करण जोहरदेखील उभा असलेला दिसत आहे. तिने बाळासोबतचा आपला फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे- Our recipe for making a sweet baby angel??
1) Quarter cup of you
2) Quarter cup of me
3) Half cup of Ma's blessings and love
4) Topped up with magic & awesomeness
5) 3 drops of rainbow essence, angel dust, unicorn sparkles and all things divine.
6) Seasoning: cuteness and yumminess as per taste❤️

बिपाशाला कन्यारत्न झाले आहे. तिने आपल्या बाळाचे नाव देवी असं ठेवलं आहे. या सुंदर अशा फोटोला चाहत्यांकडून गोड पापा आणि हार्ट इमोजी मिळत आहेत. चाहते कमेंट बॉक्समध्ये खूप सारे कमेंट करत आहेत. या फोटो मध्ये बिपाशा -करण खिडकीजवळ उभारलेले दिसत आहेत.

करण सिंह ग्रोवरने बाळाचा हात धरलेला दिसत आहे. तर अभिनेत्री बिपाशा आपल्या बाळाकडे पाहत आहे. नन्ही परीचा फोटो शेअर करत बिपाशाने मुलीच्या स्वीटनेसचे सीक्रेटदेखील सांगितले आहे. बिपाशा लिहिते, स्वीट बेबी एंजल बनवण्याची रेसिपी.

बिपाशा-करण सिंह ग्रोवरच्या मुलीला पाहिल्यानंतर फॅन्सकडून बाळाला खूप सारं प्रेम मिळत आहे. चाहते बाळाच्या फोटोवर हार्ट इमोजी बनवत आहेत. लग्नाच्या ६ वर्षानंतर बिपाशा आणि करण आई-वडील झाले आहेत. बिपाशा आणि करणने ३० एप्रिल, २०१६ रोजी लग्नगाठ बांधली. दोघांची भेट 'अलोन'च्या सेटवर झाली होती. या वर्षी ऑगस्टमध्ये बिपाशाने प्रेग्नेंसीची बातमी शेअर केली होती. संपूर्ण गरोदरपणात बिपाशाच्या मॅटर्निटी फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news