दौंड : मराठा महासंघाच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

दौंड : मराठा महासंघाच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल

दौंड; पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरात मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसला शहरातील गोल राऊंड येथे काळे फासून कर्नाटक सरकारचा निषेध केला होता. याप्रकरणी १५ ते १६ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसला काळे फसण्याबाबत सुरुवातीला पोलिसांना काहीच माहिती नव्हती, नंतर याबाबत माहिती होताच २५ नोव्हेंबरला कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये विक्रम पवार, शैलेंद्र पवार, दादा नांदखेले, आदिनाथ थोरात, रोहन घोरपडे, विकास जगदाळे व त्यांच्या सात ते आठ साथीदारांचा समावेश आहे.

पोलीस हवालदार पांडुरंग थोरात यांनी याबाबत फिर्याद दाखल केली असून त्यांनी जमाबंदीचे आदेशाचे उल्लंघन केले, तसेच बेकायदा जमाव जमवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे या कलमाखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे

Back to top button