खोर : अंजीर शेतीने घातली जागतिक उद्योजकांना भुरळ | पुढारी

खोर : अंजीर शेतीने घातली जागतिक उद्योजकांना भुरळ

खोर; पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील खोर गावातील प्रसिद्ध अंजीर शेतीने चक्क जागतिक पातळीवर आपली उंची गाठली आहे. चविष्ट, स्वादिष्ट, गोड असलेल्या अंजिराची गोडी आता देशाबाहेर पोहचली आहे. एवढेच नव्हे तर नेदरलँड देशातून 20 ग्लोबल फूड्स सप्लायर्स आणि इंडस्ट्री आंत्रप्रेन्योरचा समूह खोर येथे अंजीर शेती पाहणी व अभ्यासासाठी दाखल झाला आहे. याबाबत माहिती देताना अंजीर उत्पादक शेतकरी समीर डोंबे म्हणाले की, खोरच्या अंजिराने जागतिक पातळीवर उद्योजकांना भुरळ घातली आहे.

खोरच्या अंजीर पिकात उभ्या केलेल्या मूल्य साखळीबद्दल आणि विविध उपक्रमांबाबत विदेशी पाहुण्यांनी कौतुक केले. खोरच्या अंजिराची चव त्यांना विशेष आवडली. भविष्यात होत असलेल्या फिग, अ‍ॅग्रो, रुरल, वाइन पर्यटनाबद्दल त्यांनी विशेष रुची दाखवली आहे. लवकरच गुंतवणूक आणि जागतिक पातळीवर कामासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ही भेट घडवून आणण्यासाठी टेस्टी बाइट कंपनीचे राजेंद्र जाधव यांचे सहकार्य लाभले.

खोर येथील अंजिराची गोडी महाराष्ट्राने पाहिली होती. मात्र, अभिमान वाटतो की खोरचे अंजीर आता जागतिक पातळीवर अंजिराची गोडी देणार असून, याचा खोरकरांना सार्थ अभिमान आहे. नेदरलँड देशातून खुद्द अंजीर शेती पाहण्यासाठी परदेशी पाहुणे
येतात आणि संपूर्ण पाहणी दौरा करतात, हीच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.
                                                                     समीर डोंबे,
                                                         अंजीर उत्पादक शेतकरी, खोर

 

Back to top button