ISRO ने रचला नवा इतिहास, ओशनसॅट-३ सह ९ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण | पुढारी

ISRO ने रचला नवा इतिहास, ओशनसॅट-३ सह ९ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा : पुढारी ऑनलाईन : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज एक नवीन इतिहास रचला. इस्रोने आज ओशनसॅट-०३ (Oceansat-03) सह ९ नॅनो उपग्रहांचे श्रीहरिकोटाहून येथून यशस्वी प्रक्षेपण केले. पीएसएलव्हीचे त्याच्या ५६ उड्डाणात श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून १,११७ किलो वजनाच्या EOS-०६ (ओशनसॅट-०३) या पृथ्वी निरीक्षण उपग्रहासह नऊ उपग्रहांचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. त्यानंतर हे उपग्रह निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यात आले.

PSLV-C54 वर प्राथमिक पेलोड ओशनसॅट-०३ (EOS-06) होता. १,११७ किलो वजनाच्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाची निर्मिती इस्रोच्या यूआर राव उपग्रह केंद्राने केली आहे. PSLV वर इतर नॅनो उपग्रहदेखील आहेत, ज्यात भारताचा पहिला खासगीरित्या निर्मिती केलेल्या पृथ्वी निरीक्षण उपग्रह आनंद यांचा समावेश आहे.

या उपग्रहांच्या प्रक्षेपणानंतर सुमारे १७.१७ मिनिटांनी रॉकेटच्या चौथ्या टप्प्याने EOS-06 (Oceansat-3) ला ७४२.७ किमी कक्षेत प्रस्थापित केले. EOS-06 हा ओशनसॅट सीरीजमधील थर्ड जनरेशनचा उपग्रह आहे. EOS-06 कक्षेत स्थिरावल्यानंतर रॉकेटचे PS4 पुढील एका तासात उर्वरित उपग्रह निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी ५१६ किमी सूर्य समकालिक ध्रुवीय कक्षेमध्ये (sun synchronous polar orbit) परिभ्रमण करेल. या उपग्रहांमध्ये दोन थायबोल्ट उपग्रह (Thybolt satellites), ध्रुव स्पेसने बनवलेले कम्युनिकेशन पेलोड्सचा समावेश आहे.

त्यापाठोपाठ INS-2B हा उपग्रह (भारत-भूतान Sat) आहे जो ५२८.८ किमी उंचीवर प्रस्थापित केला जात आहे. भूतानसाठी इस्रोच्या नॅनो उपग्रह-2 (INS-2B) मध्ये दोन पेलोड्स आहेत ज्यात NanoMx, स्पेस ॲप्लिकेशन सेंटरने विकसित केलेला मल्टीस्पेक्ट्रल ऑप्टिकल इमेजिंग पेलोड आहे.

आनंद नॅनो उपग्रहाला पृथ्वीच्या कमी कक्षेत प्रस्थापित केले जाणार आहे. हा उपग्रह बंगळूर येथील पिक्सेल या स्टार्टअपने तयार केला आहे. अमेरिकेतील फर्म स्पेसफ्लाइटच्या चार नॅनो उपग्रहांवादेखील कक्षेत स्थिर केले जात आहे. ही उपग्रहे इंटरनेट ऑफ थिंग्जसाठी पेलोड म्हणून तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक म्हणून आहेत.

हे ही वाचा :

Back to top button