Prakash Raj : प्रकाश राज यांनी रिचा चड्ढाला दिला पाठिंबा, अक्षयची घेतली शाळा | पुढारी

Prakash Raj : प्रकाश राज यांनी रिचा चड्ढाला दिला पाठिंबा, अक्षयची घेतली शाळा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा चर्चेत आहे. अभिनेत्री रिचाने भारतीय लष्कराचा अपमान केल्याच्या ट्विटमुळे ती अडचणीत सापडली. (Prakash Raj) आधी अभिनेत्री रिचाला गलवान मुद्द्यावर ट्विट केल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. मग, तिच्याविरोधात चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी तक्रार दाखल केली. वाढता वाद पाहून ऋचाने आणखी एक ट्विट करून या प्रकरणावर माफी मागितली. यानंतरही हे प्रकरण मिटलं नाही. अद्याप हा वाद सुरुचं आहे. एकानंतर एक सेलेब्स तिच्याविरोधात ट्विट करत टीका करत आहेत. यादरम्यान, साऊथ अभिनेता प्रकाश राज यांनी रिचाला समर्थन दिले आहे. तर अक्षय कुमार याला फटकारले. (Prakash Raj)

रिचा चड्ढाला पाठिंबा देत साऊथ अभिनेता प्रकाश राजने अक्षय कुमारची शाळा घेतली. त्यांनी अक्षयच्या ट्विटला रिट्विट करत लिहिलं की, ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अक्षय कुमार… रिचा चड्ढा आमच्या देशासाठी तुमच्यापेक्षा अधिक प्रासंगिक आहे. याआधीही प्रकाश राजने रिचाच्या गलवान ट्विटवर लिहिलं होतं- ‘आम्ही तुझ्यासोबत रिचा चड्ढा. आम्हाला माहिती आहे की, तुम्हाला काय म्हणायचं होतं. ‘

अभिनेता अक्षय कुमारने रिचा चड्ढाच्या व्हायरल ट्विटचा स्क्रीनशॉट रिट्विट केलं आहे. यासोबत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की-‘हे पाहून खूप दु:खी आहे.आमच्या आर्मी फोर्समुळे आम्ही आज आहोत.’ यासोबत अक्षयने नमस्कार इमोजी शेअर केला आहे.

पीओकेवर लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या विधानावर रिचाने वादग्रस्त ट्विट केले होते. गलवान व्हॅलीचा उल्लेख करत तिने ट्विटमध्ये ‘Hi’ लिहिलं होतं. मात्र, वाढता वाद पाहता तिने ट्विट डिलीट करत माफी मागितली होती.

Back to top button