Beed Murder : पत्नी, मुलीचा गळा चिरुन पतीची आत्महत्या, सिरसाळ्यातील घटना

Beed Murder : पत्नी, मुलीचा गळा चिरुन पतीची आत्महत्या, सिरसाळ्यातील घटना
Published on
Updated on

परळी; पुढारी वृत्तसेवा : Beed Murder : आपल्या दोन वर्षाच्या मुलीसह पत्नीची गळा चिरुन हत्या करुन पतीने गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री सिरसाळ्यात घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पतीने केलेल्या या कृत्यामागचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.

सिरसाळा (Beed Murder) येथील मोहा रोडवर अल्लाहबक्सी अहमद शेख हा आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याने शुक्रवारी रात्री पत्नी व दोन वर्षाच्या मुलीचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन खून केला. यानंतर त्याने घरातच गळफास घेवून आत्महत्या केली.

आजुबाजूच्या लोकांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 24 सप्टेंबर रोजी रात्री 10 च्या सुमारास अल्लाहबक्सी अहमद शेख (वय 28) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच घरात त्याची पत्नी शबनम शेख (वय 22) व मुलगी अशफिया (वय 02) या दोघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. तीनही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. घटनेच्या मागची नेमकी सत्यता जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. या घटनेने मात्र सिरसाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

अल्लाहबक्सी शेख यांनी पत्नी व मुलीची हत्या करून आत्महत्या केली की आणखी काय झाले? या प्रश्नाचे उत्तर पोलीस शोधत आहेत. घटनेच्या दिवशी त्यांच्याच कुटुंबातील नातेवाईकांचे लग्न असल्याने सर्व शेजारी आणि कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. संध्याकाळी उशिरा आल्यानंतर घटनेबाबत कुटुंबाला कळले आणि मयताचे भाऊ मुजीब अहमद शेख यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news