Beed Accident : कार अपघातात दोघेजण ठार, एक जखमी | पुढारी

Beed Accident : कार अपघातात दोघेजण ठार, एक जखमी

बीड; पुढारी वृत्तसेवा : Beed Accident : बीड शहरानजीक पुलाच्या कठड्याला कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघजण ठार तर अन्य एकजण जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२४) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

दिलीप भोसले व महेंद्र गायकवाड असे अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. तर जखमी व्यक्तीचे नाव अजून समजलेले नाही. पोलिस त्याचा तपास करत आहेत.

शुक्रवारी मध्यरात्री दिलीप भोसले हे आपल्या सहकार्‍यांसह अंबाजोगाईहून बीडला येत होते. याच दरम्यान बीड बायपासवरुन त्यांची कार बीडच्या रस्त्याने पुढे येत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलाच्या कठड्यावर धडकली.

(Beed Accident) या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय अपघातात एकजण जखमी झाला आहे. तसेच अपघातात कार गाडीचे नुकसानदेखील झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच, महामार्ग पोलिसचे सुरेश गित्ते व सहकारी तसेच ग्रामीण पोलिस स्टेशनचे संतोष साबळे, उबाळे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. याच दरम्यान एकाचा मृत्यू झाला.

हेही वाचलंत का?

Back to top button