अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ : मनोरंजनाचा उघडणार पेटारा

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ : मनोरंजनाचा उघडणार पेटारा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ ऑक्टोबर महिन्यात मनोरंजनाचा पेटारा घेऊन येत आहे. थ्रिलरपासून दोन विलक्षण बायोपिक्सपर्यंत विनोदाचा एक मस्त डोस, एक चमकदार नाटक पाहायला मिळणार आहे. पृथ्वीराज सुकुमारनची मुख्य भूमिका असलेल्या 'भ्रमम' एक उत्कृष्ट मल्याळम थ्रिलरपट आहे. जो सुरुवातीला पाहता येईल. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ ऑक्टोबरमध्ये क्रांतिकारी सरदार उधम सिंह यांच्यावरील 'सरदार उधम' चरित्रपट आणत आहे. या चित्रपटात विक्की कौशलची मुख्य भूमिका आहे.

हिट मल्याळम हॉरर चित्रपट एज्राचा रीमेक पाहता येणार आहे. त्याचे नाव आहे – 'डायबूक'. यामध्ये इम्रान हाशमीची मुख्य भूमिका असेल. हा एक भयपट आहेत.

स्टॅंड-अप मालिका 'वन माइक स्टॅंड'चा दुसरा सीझन पोट धरून हसायला लावणार आहे. तसेच तमिळ भाषेतील कार्यक्रमांमध्ये भर घालण्यासाठी 'उदानपिराप्पे' हा फॅमिलि ड्रामा पाहता येणार आहे.

शशिकुमार आणि ज्योतिका आणि सूर्या अभिनीत मर्डर मिस्ट्रि 'जय भीम' सादर केली जाईल.

याव्यतिरिक्त जागतिक संगीत स्टार जस्टिन बीबरच्या जीवनातील अंतर्गत गोष्टींवरील एक डॉक्युमेंट्री पाहता येईल. टीन हॉरर ड्रामा 'आय नो व्हॉट यु डिड लास्ट समर' दिसेल.

'मॅराडोना- ब्लेस्ड ड्रीम' ऑल टाईम फेव्हरेट फूटबॉलपटू डिएगो अरमांडो मॅराडोनाच्या आयुष्यावर आधारित एक विशेष मालिका येईल.

देव पटेल अभिनीत 'द ग्रीन नाइट', सर गवेन आणि द ग्रीन नाईटची गाथेचे रिटेलिंग असलेली मध्ययुगीन फॅंटसी घेऊन येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news