मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल अमेझॉन प्राईम व्हिडिओवर 'सरदार उधम' घेऊन येत आहे. ही एक असाधारण युवकाची न सांगितली गेलेली कहाणी आहे, त्याने स्वतंत्रता संग्रामासाठी आपले जीवन समर्पित केले.
सरदार उधम सिंह हा चित्रपट सुजीत सरकारद्वारे दिग्दर्शित आणि रोनी लाहिरी व शील कुमार यांच्याद्वारे निर्मित आहे.
ऑक्टोबरमध्ये केवळ अमेझॉन प्राईम व्हिडिओवर 'सरदार उधम' चाहत्यांना पाहता येणार आहे.
हा चित्रपट सरदार उधम या एका वीर व्यक्तिची साहसयात्रा दर्शवितो, ज्याने हे दाखवून दिले आहे की, आपल्या प्रेमळ देशवासियांच्या आयुष्याला कधीच विसरू नये, जे १९१९ च्या जलियनवाला बाग नरसंहारात क्रूरपणे मारले गेले.
निर्माता रोनी लाहिरी यांनी याबाबत सांगितले की, "उधम सिंह यांची देशभक्ती आणि आपल्या मातृभूमीसाठी नि: स्वार्थ प्रेम करणार्या देशभक्तावर चित्रपटाला निर्मिती करणे उत्साहजनक होते.
विक्कीने आपल्या संपूर्ण जीवन यात्रेत 'उधम सिंह' यांच्या असंख्य भावनांचे वास्तविक सार समोर आणण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. आम्ही अमेझॉन प्राईम व्हिडिओसोबतच्या शानदार सहयोगासाठी आनंदित आहोत, या ऐतिहासिक महाकाव्य कथानकाला वैश्विक दर्शकांसमोर सादर करण्यासाठी रोमांचित आहोत." असेही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?