निवाने बारी घाटात दरड कोसळली, रस्‍ता वाहतुकीस खुला करण्‍याची मागणी | पुढारी

निवाने बारी घाटात दरड कोसळली, रस्‍ता वाहतुकीस खुला करण्‍याची मागणी

देवळा ; पुढारी वृत्तसेवा:  देवळा तालुक्यातील खर्डे परिसरातील निवाने बारी घाटात दरड कोसळली आहे. वाहतूक सेवा बंद झाली आहे. निवाने बारी घाटात दरड कोसळलेल्‍या घटनेची सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा ,अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

माजी राज्य मंत्री स्व ए टी पवार यांच्या विशेष प्रयत्नातून कळवण व देवळा तालुक्यातील नागरिकांसाठी दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सण २००० सालात या भागाला जोडणारा निवाणे बारी घाट सुरू केला आहे .

या घाटातून खर्डेसह परिसरातील तसेच कळवण तालुक्यातील नागरिक ये-जा करतात. मंगळवारी( दि २८ )रोजी रात्रीच्या सुमारास घाटात दरड कोसळली. या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

सातत्‍याने दरड कोसळण्‍याचे प्रकार

निवाने बारी घाटात सतत दरड कोसळल्याचे प्रकार घडतात.त्‍यामुळे वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

याठिकाणी दरड कोसळल्याने कुठलेही मोठे वाहन या भागातून जात नाही.

प्रवास करतांना या मार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांच्‍या अडचणीत भर

कळवण जाण्यासाठी देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिक या मार्गाचा वापर करतात.

शेतकरी कांदे व अन्य पीक देखील याच मार्गाने घेऊन जात असल्याने सध्यातरी त्‍यांची अडचणी वाढणार आहेत.

प्रशासनाने लवकर या रस्त्यावरील दरडी दूर करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा , अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

या भागात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने ही दरड कोसळून रस्त्यावर आली आहे.

सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली, तरी प्रत्येक वर्षी या भागात दरड कोसळत असल्याने प्रशासनाने उपाययोजना करणं गरजेचं आहे. अशी मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय जगताप यांनी केली आहे.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button