रितेश देशमुख म्हणतो, "तुम्ही तुमच्या बायकोवर लक्ष ठेवा"  - पुढारी

रितेश देशमुख म्हणतो, "तुम्ही तुमच्या बायकोवर लक्ष ठेवा" 

पुढारी ऑनलाईन डेस्क : जेनिलिया आणि रितेश देशमुख हे खरंतर बाॅलिवुडचं स्वीट कपल म्हणून ओळखलं जातं. हे कपल सोशल मीडियावर चांगलंच सक्रिय असतं. त्यांचा चाहता वर्गही चांगला मोठा आहे. ट्रोल करणाऱ्यांना रितेश नेहमीच दुर्लक्ष करत आला आहे. पण, यावेळी मात्र त्याने एका ट्रोलरला चांगलंच उत्तर आहे.

बाॅलिवुडच्या अभिनेता अरबाज खानच्या ‘पिंच-२’ या टाॅक-शोमध्ये जेनिलिया आणि रेतिशे दोघेही आले होते. त्याच्या प्रोमे अरबाजने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये ट्रोल करणाऱ्यावर रितेश काही मत मांडले आहे.

रितेशला एका युजर्सने प्रतिक्रिया देता सांगितले होते की, “तू तुझ्या पत्नीवर जास्त लक्ष ठेवले पाहिजे.” यावर उत्तर देताना रितेश देशमुख म्हणतो की, “मला पण वाटतं की, तुम्ही तुमच्या पत्नीवर लक्ष घ्या, माझ्या पत्नीवर नाही.” असा किस्सा रितेशन सांगितला आहे. तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इतकंच नाही, जेनिलियावरदेखील एका युजर्सने काॅमेंट केली होती. त्यात तो म्हणाला होता की, “जेनिलिया ओव्हर एक्टींग करते. ती एक चीप, निर्लज्ज आणि असभ्य काकू आहे.” या युजर्सला सडतोड उत्तर देताना जेनिलिया म्हणते की, “मला असं वाटतं की, या व्यक्तीला घरात चांगली वागणूक दिली जात नाही. भाऊ मला आशा आहे की. तुम्ही ठीक आहात”, असा टोला ही जेनिलियाने त्या युजर्सला लगावला आहे.

पहा व्हिडीओ : ‘एक थी बेगम’ बद्दल सांगतेय स्वतः बेगम अनुजा साठे

हे ही वाचा…

Back to top button