बीड : मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी बालाजीला पायी जाताना शिवसैनिकाचे निधन | पुढारी

बीड : मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी बालाजीला पायी जाताना शिवसैनिकाचे निधन

बीड, पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे व पक्षाला निवडणूकीत यश मिळावे, यासाठी बीड येथील माजी नगरसेवक सुमंत रुईकर व श्रीधर जाधव १ डिसेंबर रोजी तिरुपती बालाजीला पायी निघाले होते. यादरम्यान सुमंत रुईकर यांना ताप आल्यानंतरही त्यांनी आपला पायी प्रवास सुरुच होता. रायचुरजवळ ते चक्कर येऊन रस्त्याच्या बाजुला पडल्यानंतर परिसरातील लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल कले. त्यांच्या कुटूंबियांना कल्पना दिली. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नेत्याच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करणार्‍या या शिवसैनिकाच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

बीड येथील माजी नगरसेवक सुमंत रुईकर हे शहर व जिल्ह्यात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात. सुरवातीपासूनच त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव होता. सत्ता असो अथवा नसो, पक्षाचे कोणते पद असो वा नसो शिवसेना हाच त्यांचा प्राण होता. शिवसेनेविरोधात कोणी बोललेलेही त्यांना सहन होत नसे. मुद्दा, अशी सुमंत रुईकर यांची ओळख होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांनी यापूर्वी एकदा तिरुपती बालाजीला पायी जाण्याचा संकल्प केला होता. तो त्यांनी पूर्ण केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीही झाले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतरही सुमंत रुईकरांनी बालाजीला साकडे घालत उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी पायी बालाजीला जाण्याचा निर्णय घेतला.
दररोज ३५ किलोमीटर चालत ते कडप्पापर्यंत पोहचले. परंतु या प्रवासातील ताणामुळे त्यांना ताप आला. रुग्णालयात उपचार घेवून त्यांची पुन्हा आपला प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

त्याच्या मित्राने ही बाब त्यांच्या घरी कळवली. त्यानंतर रूईकर हे परत बीडच्या दिशेने रेल्वेने निघाले होते. सोलापूरला पोहचण्यापूर्वी तेलंगणातील रायचूर स्टेशनवर रात्रीच ते उतरले. पुन्हा एकदा बालाजीला जाण्यासाठी प्रवास सुरु केला. त्यांना ताप आणि थकवा असल्याने रायचूरपासून २० किलोमीटर अंतरावर आल्यावर ते कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या कूटूंबाशी संपर्क करून त्यांना कल्पना दिली. शनिवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, वडील असा परिवार आहे.

हेही वाचा

पाहा व्‍हिडिओ : मनुस्मृतीचे दहन आणि बाबासाहेबांचा विद्रोह | Dr. Babasaheb Ambedkar

Back to top button