Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार, १५ एप्रिल २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार, १५ एप्रिल २०२४

चिराग दारूवाला :

 

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष: कौटुंबिक समस्येवर उपाय मिळाल्याने दिलासा मिळेल. घरातील कामे मार्गी लावण्‍यात दिवस जाईल. कौटुंबिक लोकांच्या सहकार्याने आर्थिक विषयक कामे मार्गी लागतील. अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करुन तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. इतरांच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याने तुमची प्रतिष्ठा कमी होऊ शकते. मुलांच्या अभ्यासाशी संबंधित समस्यांमुळे तणाव निर्माण होईल. व्यवसायात मेहनतीच्‍या जोरावर कामे पूर्णत्‍वास नेली जातील.

वृषभ : तुमची काही खास लोकांशी भेट होईल. संवादाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे काम करू शकाल. चुकीच्या कामांकडे लक्ष न देता आपल्या कार्यात समर्पित व्हा. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकतो, अशी सूचना श्रीगणेश देतात. अनावश्यक खर्चामुळे गुंतागुंत होऊ शकते. तुमचे बजेट सांभाळा.कायदेशीर वादात अडकू नका. वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नका. व्यवसायाशी संबंधित कामांसाठी वेळ अनुकूल आहे.

मिथुन : सध्याची ग्रहस्थिती तुम्हाला अद्भुत शक्ती प्रदान करेल. संपर्काची सीमा वाढतील.विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामात यश मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मालमत्तेची किंवा वाहनाची समस्या असू शकते. तुमच्या योजनांना सुरुवात करण्यासाठी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. फोनवर किंवा मित्रांसोबत आपला वेळ वाया घालवू नका.

कर्क : श्रीगणेश सांगतात की, आज जीवनशैलीत काही सकारात्मक बदल अनुभवाल. जोखीम घेण्याची तयारी असेल. एखाद्या विशिष्ट कार्यासाठी प्रयत्नशील राहा. तुम्हाला योग्य यश मिळू शकते. घाई करू नका आणि अनुभवी व्यक्तीशी चर्चा करत राहा. तुमच्या योजनेनुसार कामे न केल्यामुळे नुकसान होऊ शकते. खर्च वाढला तरी उत्पन्नाचे साधनही वाढेल. मार्केटिंग संबंधित कामांचा विस्तार करण्यावर भर द्या.

सिंह: आज कौटुंबिक सुखसोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी कराल. अभ्यास आणि करिअरशी संबंधित समस्येचे निराकरण झाल्‍याने विद्यार्थ्यांना तणावमुक्त वाटेल. मोठा निर्णय घेण्याचे धाडस तुम्‍ह कराल. एखाद्या विश्वासू व्यक्तीकडून घेतलेला सल्‍ला फायदेशीर ठरेल. आवश्यक खर्चातही कपात करावी लागू शकते. छोट्या-छोट्या गोष्टींवर नाराज होणे तुमच्या स्वभावात असेल. दिवसाच्या सुरुवातीला काही आव्हान असतील, असे श्रीगणेश सांगतात.

कन्या : श्रीगणेश म्‍हणतात की, शिक्षणाशी संबंधित अडथळा दूर झाल्यामुळे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. मालमत्तेसंबंधी कोणताही वाद शांततेने सोडवाल. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. नातेवाईकांशी संघर्षामुळे वाद होण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. चुकीच्या कामात वेळ वाया गेल्याने मन निराश होईल.

तूळ : आज जनसंपर्काची व्याप्ती वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. एखाद्या संस्थेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. नियमित दिनचर्येचे पालन करा. कोणतीही योजना सुरु करण्‍यापूर्वी गांभीर्याने विचार करा. अन्यथा चुका होऊ शकतात. आर्थिक व्यवहारात कोणावरही विश्वास ठेवण्याआधी विचार करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

वृश्चिक : आज प्रतिष्ठित लोकांच्या भेटीमुळे फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी देखील शक्य आहे. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी असू शकते. दिवसाच्या सुरुवातीला काही अडचणी येण्‍याची शक्‍यता. नकारात्मक कृती करणाऱ्या लोकांपासून दूर राहा, त्यांचा चुकीचा सल्ला तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकतो. घरातील मोठ्यांच्या सल्ल्याकडे आणि मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका, अशी सूचना श्रीगणेश देतात. व्यावसायिक कार्ये अधिक चांगली ठेवण्यासाठी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे उचित ठरेल.

धनु: ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवा. दृढनिश्चयाने कठीण कामे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. भांडवली गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल निर्णय घ्‍या. स्वतःवर विश्वास ठेवा. इतरांच्या बोलण्यात अडकून तुम्ही स्वतःचे नुकसान करू शकते. दिवसाच्या सुरुवातीला प्रत्येक हालचालीबाबत सावध राहणे आवश्यक आहे. आळसामुळे कोणतेही काम टाळण्याचा प्रयत्न करू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात योग्य सुव्यवस्था राखण्यात तुम्ही सक्षम व्हाल, असे श्रीगणेश म्‍हणतात.

मकर : आज दिवसाच्या मध्यानंतर परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील, असे श्रीगणेश सांगतात. काही काळ तुमच्या विरोधात असलेले लोक आता तुमच्या बाजूने येतील. कर्ज घेणे टाळा. कोणाला वचन दिले असेल तर ते पूर्ण करण्याची जबाबदारीही पार पाडा.

कुंभ : काही अडचणी आल्या तरीही सकारात्मक विचारातून तुमचा मार्ग शोधू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात काही काळापासून सुरू असलेले गैरसमज मध्यस्थीने दूर होतील. वारसाहक्कातील मालमत्तेशी संबंधित विषयावर भावांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. कोणतीही नवीन गुंतवणूक टाळा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

मीन : श्रीगणेश म्हणतात की, आज धार्मिक स्थळी गेल्याने मनःशांती लाभेल. सामाजिक कामांमध्ये तुमचे विशेष योगदान असेल. तुम्ही अनेक कामांमध्ये व्यस्त असाल. अनावश्यक वाढलेले खर्च तुम्हाला त्रास देतील. सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे. घाई आणि अतिउत्साहामुळे केलेल्या गोष्टी बिघडू शकतात.

Back to top button