Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, ३० मार्च २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, ३० मार्च २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष: ज्येष्ठांचे मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करु नका. विद्यार्थी अभ्यासाबाबत गांभीर्याने विचार कतील. अति खर्चामुळे तणाव निर्माण होवू शकतो, असे श्रीगणेश सांगतात. दुपारनंतर परिस्थिती थोडी प्रतिकूल राहू शकते. करिअर आणि कार्यक्षेत्रात सर्वोत्तम काम करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.आज बहुतांश वेळ कुटुंबासोबत आनंदात व्‍यतित कराल.

वृषभ : श्रीगणेश सांगतात की, दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवण्यासाठी नियोजन कराल. मनःशांती लाभेल. इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याऐवजी, आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून वाटचाल करा. जवळच्या मित्रांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांच्या भेटीमुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. सध्या नकारात्मक वातावरण टाळावे लागेल.

मिथुन: गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल असल्याचे श्रीगणेश म्‍हणतात. घरातील बदल या विषयावरही महत्त्वाची चर्चा होईल. तुमच्या मार्गदर्शनाखाली मुले काही विशेष यश मिळवू शकतात. कुटुंबासोबत मनोरंजन आणि आरोग्याशी संबंधित कामांमध्येही वेळ जाईल. आळशीपणामुळे कामाकडे दुर्लक्ष करू शकता, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. हुशारीने आणि सावधपणे वागण्याची वेळ आहे. कार्यक्षेत्रातील रखडलेल्या कामांना आता वेग येईल.

कर्क : ग्रहस्थिती अनुकूल होत असल्‍याचे श्रीगणेश सांगतात. आर्थिक स्थिती चांगली ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रभावशाली लोकांशी संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते.

सिंह : मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित यश मिळेल. तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल. नातं गोड ठेवण्यासाठी तुमचं विशेष योगदान असेल. ताणतणाव करण्याऐवजी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. या काळात अनावश्यक प्रवास टाळा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

कन्या : काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आज दूर होईल, असे श्रीगणेश सांगतात. उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळू शकतात. घरातील कोणतीही समस्या रागावण्याऐवजी शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात सुरू असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

तूळ: श्रीगणेश म्‍हणतात की, तुमची जीवनशैली अधिक प्रगत ठेवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशी संबंधित कार्यात यश मिळू शकते. विवाहितांचे सासरच्या लोकांशी मतभेद होण्‍याची शक्‍यता. संयमाने परिस्थिती हाताळा. अन्यथा तुमची छाप खराब होऊ शकते. वैयक्तिक कारणांमुळे व्यवसायाकडे दुर्लक्ष होण्‍याची शक्‍यता.

वृश्चिक: दिवसाच्या सुरुवातीला कामात व्यस्त असाल. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळेल. सार्वजनिक व्यवहार, ग्लॅमर इत्यादी व्यवसायात यश मिळेल. घरातील वातावरण आनंददायी आणि शांततापूर्ण राहील, असे श्रीगणेश सांगतात. जास्त कामामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो.

धनु : आज निकटवर्तींयांची भेट होईल. आनंदात वेळ जाईल. कोणत्याही विशेष विषयावर फायदेशीर चर्चा होईल. चुकीच्या कामांवर जास्त खर्च केल्यामुळे त्रास होऊ शकतो. क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. मान्यवर आणि प्रतिष्ठित लोकांशी संबंध राखणे तुमच्या व्यवसायात फायदेशीर ठरेल.

मकर : काही लोक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात, तुम्ही चिंता न करता तुमच्या कामाची जाणीव ठेवा. तुम्हाला यश नक्कीच मिळू शकेल, असे श्रीगणेश सांगतात. वैयक्तिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. अतिआत्मविश्वास आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा. घरातील वडिलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कार्य करा. कार्यक्षेत्रातील बहुतेक कामे सुरळीत पार पडतील. रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी गाफील राहू नये, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

कुंभ : आज सामाजिक कार्यातील योगदानामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहणे चांगले. घर आणि व्यवसायात योग्य सामंजस्य राखले जाईल. घरातील वडिलधाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.

मीन : श्रीगणेश म्‍हणतात की, तुमच्या कार्यांना नवीन आकार देण्यासाठी अधिक सर्जनशील दृष्टीकोन स्वीकारा. जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल. जवळच्या नातेवाईकाच्या वैयक्तिक जीवनात काही अडचणींमुळे चिंता होईल. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे.

Back to top button