Nashik Crime Update | धुलिवंदनाच्या दिवशी गप्पांच्या रंगात मित्रांनी केला मित्राचा खून | पुढारी

Nashik Crime Update | धुलिवंदनाच्या दिवशी गप्पांच्या रंगात मित्रांनी केला मित्राचा खून

नाशिक (पंचवटी) : पुढारी ऑनलाईन डेस्क
शहरात होळी व धुलिवंदानाच्या सणाला गालबोट लागले असून भर मध्यरात्री पंचवटी परिसरात एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन जणांना ताब्यात घेतले असून इतर चौघांचा शोध सुरु आहे. यामध्ये चारजण मारेकरी विधीसंघर्षित आहेत.

मयताचा भाऊ रोहित श्रीपत उपाडे (वय २३ वर्ष, रा. कालिका नगर, मायको हॉस्पिटल मागे, गल्ली नंबर ६, दिंडोरी रोड, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी परिसरात रविवार (दि. २४) रोजी रात्री १:४८ वाजेच्या सुमारास म्हाडा बिल्डिंगच्या मागे, सुलभ शौचालया जवळ, फुलेनगरमध्ये निलेश श्रीपत उपाडे (वय २१) व काही मित्र उमेश साबळे हे गप्पांमध्ये रंगले होते. मात्र गप्पा मारतांना त्यांच्यात मागील भांडणाची कुरापत निघाली. भांडणाच्या कारणावरून सहा जणांकडून धारदार हत्याराने निलेशच्या मानेवर, पोटावर व पाठीवर सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केल्याने नीलेश जागीच ठार झाला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात सोमवार (दि.२५) रोजी आरोपी सहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खूनप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अन्य चार जणांचा शोध सुरु आहे. तर पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. एस. जाधव हे तपास करीत आहेत.

Back to top button