का साजरा केला जातो 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय साडी दिवस ; जाणून घ्या | पुढारी

का साजरा केला जातो 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय साडी दिवस ; जाणून घ्या

पुढारी ऑनलाईन : आज जागतिक साडी डे आहे. भारतीय जगाच्या पाठीवर कुठेही ओळखता येते ती या साडीमुळेच. साडीला जवळपास 3000 वर्षांचा इतिहास आहे. शातीका या संस्कृत शब्दापासून साडी या शब्दाची निर्मिती झाली आहे. कपड्याची पट्टी असा अर्थ असलेल्या या साडीने आजवर प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. बौद्ध साहित्यात ‘सत्तीका’ या शब्दांत साडीचा उल्लेख आढळतो. काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार 2800 – 1000 इसवीसना पूर्वी साडी विणण्याची कला भारतात आली. सिंधु सभ्यतेमध्ये साडीला एक ठराविक रूप मिळालं. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक

जगभरात आजचा दिवस म्हणजे 21 डिसेंबर हा साडी दिवस म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला या मागचा इतिहास माहिती आहे का ? हा दिवस साडी विणणाऱ्यांचा सन्मान म्हणून जगभरात साजरा केला जातो.

भारतात साड्यांचे आणि ती परिधान करण्याच्या अनेक पद्धती आहेत. वेगळ्या शैलीतील साड्यांमध्ये कांजीवरम, बनारसी, पैठणी, पटोला आणि हकोबा हे मुख्य प्रकार आहेत. तर भारताच्या विविध भागात विविध प्रकारच्या साड्या नेसल्या जातात. यामध्ये मध्यप्रदेशच्या चंदेरी, महेश्वरी, मधुबनी, आसामची मुंगा रेशीम, ओरिसाची बोमकई, राजस्थानची बांधणी, गुजरातची काठोडा, पटोला, बिहारची टसर, काथा, छत्तीसगढची कोसा रेशम, महाराष्ट्राची पैठणी, तामिळनाडूची कांजीवरम, उत्तर प्रदेशची तांची, जामदानी, पश्चिम बंगालची बालूछरी या साड्या प्रसिद्ध आहेत.

भेट देण्यासाठी कायमच ट्रेंडमध्ये असलेल्या साड्या :

बनारसी : शाही लूकशी साधर्म्य मिळत असल्याने बनारसी साडीला विशेष मागणी असते. यावर जास्त ज्वेलरी कॅरी केली नाही तरी चालते.

चंदेरी साडी : चंदेरी साडी कलेक्शनमध्ये असणं प्रत्येक स्त्रीच स्वप्न असतं. यामध्ये प्यूअर सिल्क, चंदेरी कॉटन सिल्क कॉटन याचाही समावेश असतो .

पैठणी : महाराष्ट्राचं महावस्त्र असलेल्या पैठणीशिवाय प्रत्येक सोहळा अपूर्ण आहे.

Back to top button