पुण्यात निवडणूक निकालानंतर दोन गटांत धुमश्चक्री ; तब्बल 96 जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुण्यात निवडणूक निकालानंतर दोन गटांत धुमश्चक्री ; तब्बल 96 जणांवर गुन्हा दाखल

बारामती : पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सायंबाचीवाडी (ता. बारामती) येथे दोन गटांत धुमश्चक्री झाली. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी 96 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये खडकी कॅन्टॉन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, सोमेश्वरचे माजी संचालक डी. पी. जगताप आदींचा समावेश आहे.

पोलिस कर्मचारी तौसिफ मणेरी यांनी याबाबत फिर्याद दिली. दुर्योधन भापकर, साहेबराव भापकर, गौरव भापकर, निखिल भापकर, आदित्य भापकर, हर्षद भापकर, मयूर भापकर, विजय भापकर, केशव भापकर, दीपक भापकर, विकास अभंग, नानासाहेब भापकर, सूरज जगताप, वैभव भापकर, मंथन भापकर, सौरभ घाडगे, यश भापकर, प्रवीण जगताप, यश जगताप, भरत आंधळे, ऋषीकेश जगताप, वैभव जगताप, हनुमंत भग, विकास जगताप, श्रीकांत भापकर, मेघराज जगताप, रघुनाथ भगत, सुभाष जगताप, मयूर जगताप, प्रतीक जगताप, मंगेश जगताप, प्रणव जगताप, शतायू जगताप, दिलीप जगताप, प्रमोद जगताप, नीलेश जगताप व इतर 60 जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

सोमवारी (दि. 6) रोजी दुपारी ही घटना घडली. दुर्योधन भापकर व डी. पी. जगताप यांच्यात ग्रामपंचायतीची लढत झाली. भापकर यांच्या पॅनेलने सरपंचपदासह सदस्यपदाच्या दोन जागा पटकावल्या. तर, जगताप यांच्या पॅनेलने पाच जागा मिळविल्या. निवडणूक निकालानंतर हे दोन्ही गट आमने-सामने आल्यावर त्यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. दगडफेकीत वाहनांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. पोलिसांनी या प्रकरणी 96 जणांवर गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी, शस्त्रबंदीचा आदेश असताना त्याचे उल्लंघन करीत बेकायदा गर्दी, जमाव जमवत आरडाओरडा, मारामारी, दंगा करून शांततेचा भंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सरकारी कामात अडथळा
दुर्योधन तुकाराम भापकर यांच्या विरोधात सायंबाचीवाडी येथील पोलिस पाटील गोविंद जयसिंग जगताप यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याची स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा :

Back to top button