राजस्थानात भाजपला मोठे बळ ; महाराणा प्रतापांचे वंशज पक्षात दाखल | पुढारी

राजस्थानात भाजपला मोठे बळ ; महाराणा प्रतापांचे वंशज पक्षात दाखल

पुढारी ऑनलाईन : शूर योद्धा महाराणा प्रताप यांचे वंशज विश्वराज सिंग मेवाड आणि करणी सेनेचे संस्थापक लोकेन्द्र सिंग कलवी यांचे पुत्र भवानी सिंग कलवी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे उदयपूरमध्ये आता भाजपाच्या पाठी राजपूत समाजाचा मोठा पाठिंबा असल्याच बोललं जात आहे. दिल्ली येथील पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. या पक्ष प्रवेशात खासदार दिया कुमारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विश्वराज आगामी निवडणूक लढवू शकतात. ते उदयपुरची जागा लढवणार असल्याचं बोललं जात आहे. ही भाजपाची पारंपरिक जागा असल्याचं बोललं जात आहे. तर नागौर येथील देगाना येथून भवानी सिंग कलवी निवडणूक लढवू शकतात.

उदयपूरला पर्याय मिळाला…

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आसामचे विद्यमान राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी यापूर्वी उदयपूरची जागा अजिंक्य ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर भाजपा एक उत्तम पर्यायाच्या शोधात होती. विश्वराज यांच्या रूपाने भाजपाला उदयपूरसाठी चेहरा मिळाला आहे.

मागच्या निवडणुकीत भारतीय पक्षाची नागौरची जागा डाळमळीत झाली होती. हनुमान बेनिवाल यांच्यानंतर नागौरमध्ये पक्षाचा चेहरा कोण असेल हा प्रश्न भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसामोर होता. ज्योती मिरधानंतर कलावी यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर आता हा पेच सुटू शकेल. मिरधा यांच्यामुळे कॉँग्रेसची पारंपरिक जाट व्होट बँक कमी होईल असं बोललं जात आहे. मारवाड प्रांतात माजी केंद्रीय मंत्री कल्याण सिंग कलवी यांचे नातू असलेले भवानी सिंग हे राजपुती मतांवर चांगला प्रभाव टाकू शकतात असं बोललं जात आहे.

हेही वाचा :

Back to top button