Ajit pawar latest : अजित पवारांच्या शपथविधीवर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया | पुढारी

Ajit pawar latest : अजित पवारांच्या शपथविधीवर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीच्या ३५ ते ४० आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले. पवार यांनी आज (दि. २) उपमुख्यमंत्री पदाची शपथ (Ajit pawar latest )घेतली. या घडमोडीमुळे राज्याच्या राजकारणासह महाविकास आघाडीत भूकंप झाला आहे. दरम्यान, या राजकीय घडामोडीवर काँग्रेस ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

राष्ट्रवादीतील  (Ajit pawar latest) फुटीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर नेत्यांशी चर्चा केली आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करणे, योग्य ठरणार नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावर आपली भूमिका स्पष्ट करतील, असे सांगून भाजप जनतेच्या प्रश्नावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी ऑपरेशन लोटस राबवित आहे. भाजप लोकशाही मानत नाही,असा आरोप पटोले यांनी केला. काँगेस जनतेचे प्रश्न मांडत राहील. महागाईसह जनतेचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत, याविरोधात राज्य सरकारला काँग्रेस जाब विचारत राहील, असे पटोले म्हणाले.

दरम्यान, आम्ही मविआ सरकारमध्‍ये शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतच का जाऊ शकत नाही, असा सवाल करत अजित पवार यांनी आपल्या बंडाचे समर्थन केले आहे. तसेच यापुढे राष्‍ट्रवादी, भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणूक लढवतील, अशी घाेषणाही त्‍यांनी केली.  महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री (Ajit pawar latest)  पदाची शपथ घेतल्यानंतर आज (दि.२ जुलै) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी अजित पवार (Ajit pawar latest) म्‍हणाले, “देशातील आणि राज्यातील परिस्थिती पाहता देशाच्या विकासाला महत्त्व दिले पाहिजे, असे सहकार्‍यांशी चर्चा करताना लक्षात आले. त्यामुळेच आम्ही शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत, ते देशाला मजबुतीने पुढे नेत आहेत.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही भगदाड पाडण्यात भारतीय जनता पक्षाला अखेर यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपच्‍या  गळाले लागले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राष्‍ट्रवादीला हा मोठा धक्‍का मानला जात असून, या फुटीनंतर राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार काय म्‍हणाले याबाबतचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

हेही वाचा 

Sharad Pawar’s Karad trip tomorrow : शरद पवार उद्या कराडात; चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेऊन मांडणार भूमिका

Raj Thackeray : महाराष्ट्राचा ‘सिंहासन’मधील दिगू टिपणीस झाला : राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया

Ajit pawar latest : शपथविधीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “यापुढे राष्‍ट्रवादी, भाजप…”

Back to top button