Sharad Pawar's Karad trip tomorrow : शरद पवार उद्या कराडात; चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेऊन मांडणार भूमिका | पुढारी

Sharad Pawar's Karad trip tomorrow : शरद पवार उद्या कराडात; चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेऊन मांडणार भूमिका

कराड पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका राहील असे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत आपणाला कल्पना नव्हती याबाबत आपणाला कोणा चाही संपर्क झाला नाही,असेही आमदार पाटील म्हणाले.

काही दिवसापासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे म्हणत होते.मात्र हा विस्तार अशा पद्धतीने होईल असं वाटलं नव्हतं. राष्ट्रवादीचे काही आमदार अजित पवार यांच्यासोबत मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. सत्तेसाठी काहीनी हा निर्णय घेतला असेल पण अजित पवार इतक्या तातडीने निर्णय घेतील असे वाटले नाही. सोमवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार कराडला येत आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत या विषयावर अधिक चर्चा होईल असेही आमदार पाटील म्हणाले.

Back to top button