नाशिक : दंगलीची अफवा पसरताच पाथर्डी फाट्यावर पोलिसांचा ताफा सज्ज! | पुढारी

नाशिक : दंगलीची अफवा पसरताच पाथर्डी फाट्यावर पोलिसांचा ताफा सज्ज!

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

पाथर्डीफाटा येथे दंगल झाल्याच्या अफवेने अंबड पोलिस ठाण्यासह इंदिरानगर व सातपूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाथर्डी फाटा येथे मोठ्या प्रमाणात पोलिस ताफा पाहून नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. परंतु मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.  सिडको परिसरात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जातीय दंगा झाला असल्याचा फोन आल्यानंतर अंबड पोलीसांनसह इंदिरानगर पोलीस, सातपूर पोलीस व वाहतूक शाखा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दोन गटात होणारा वाद मिटविण्याकरिता पोलीस प्रशासन ऍक्शन मोड वर येत दंगा नियंत्रणात आणला. यावेळी आठ संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आली. तर तीन जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पाथर्डी फाटा परिसरात सकाळी दंगा झाल्याचा फोन आल्यानंतर पोलीस प्रशासनाचा मोठा फौज फाटा येथे उपस्थित झाला. लोकांमध्ये प्रचंड भीतीचे सावट निर्माण झाले होते. परंतु हे मॉकड्रिल म्हणजेच जातीय दंगा काबू योजना असल्याचे समजताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी दंगा करणाऱ्या आठ संशयित आरोपींना अंबड पोलिसांनी अटक केली असून तीन जखमी रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या मॉकड्रिलमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, गणेश न्याहदे, राजू पाचोरकर, पंकज भालेराव, पंकज जाधव यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अंबड पोलीस स्टेशन मधील १ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ३ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व ३० अंमलदार, एमआयडीसी चिंचाळे पोलीस चौकी कडील १ पोलीस निरीक्षक १० अंमलदार, इंदिरानगर पोलीस ठाणे कडील १ पोलीस निरीक्षक, ४ सहाय्यक पोलीस निरीक्षक २० अंमलदार, सातपूर पोलीस ठाणे कडील १ पोलीस निरीक्षक,१०अंमलदार. शहर वाहतूक शाखा कडील १ पोलीस निरीक्षक ४ अमलदार उपस्थित होते.१६ होम गार्ड व २ रुग्णवाहिका असा फौज फाटा प्रसंगी उपस्थित होता. दंगाकाबू योजनेची रंगीत तालीम झाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी रंगीत तालीम करता उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दंगा काबू योजनेच्या संदर्भात सूचना दिल्या. या वेळी अंबड पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर . इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्याहदे उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button