Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीया, जाणून घ्या पूजा आणि सोने खरेदीचा मुहूर्त | पुढारी

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीया, जाणून घ्या पूजा आणि सोने खरेदीचा मुहूर्त

पुढारी ऑनलाइन डेस्क : Akshaya Tritiya 2023 : आज अक्षय्य तृतीया. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्व आहे. यासाठी अनेक धार्मिक-पौराणिक, मान्यता आहे. वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यादिवशी सूर्य आणि चंद्र दोघेही वृषभ राशीत आहेत, म्हणून दोघांचे एकत्रित आशीर्वाद अक्षय्य होतात. अक्षय्य म्हणजे – ज्याचा क्षय होत नाही. या तिथीला केलेल्या कामाचे फळ नष्ट होत नाही असा समज आहे. त्यामुळेच या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्व आहे. तसेच कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर केली जाते. जेणेकरून नवीन कार्याची भरभराट होत राहावी.

Akshaya Tritiya 2023 : दानाचे महत्व

या दिवशी परशुराम, नर-नारायण, हयग्रीव यांचा अवतार झाल्याचे मानले जाते. या दिवसापासून बद्रीनाथचे दरवाजेही उघडतात आणि या दिवशी वृंदावनात भगवान बांकेबिहारीचे पाय दिसतात. त्यामुळेच या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करतात. तसेच या दिवशी दिलेल्या दानालाही खूप महत्व आहे. कारण या दिवशी केलेले दान अक्षय्य राहते. त्यामुळे दिवशी केलेल्या दानामुळे जे पूण्य मिळते ते देखील अक्षय्य राहते. म्हणून या दिवशी दानाला विशेष महत्व आहे.

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीया 2023 पूजेचा शुभ मुहूर्त

अक्षय्य तृतीया 22 एप्रिल 2023 रोजी म्हणजेच आज शनिवारी साजरी होत आहे. अक्षय्य तृतीयेची तारीख 22 एप्रिल रोजी सकाळी 07.49 वाजता म्हणजेच आज सकाळी सुरू होत आहे आणि ती 23 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या सकाळी 07.47 वाजता समाप्त होत आहे. अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त आज सकाळी 07:49 ते दुपारी 12:20 पर्यंत असेल. पूजेचा एकूण कालावधी 4 तास 31 मिनिटे असेल.

Akshaya Tritiya 2023 : सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त (अक्षय्य तृतीया 2023 खरेदी शुभ मुहूर्त)

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची वेळ आज 22 एप्रिल म्हणजेच सकाळी 07:49 वाजल्यापासून सुरू होईल आणि 23 एप्रिलपर्यंत म्हणजेच उद्या सकाळी 05:48 वाजेपर्यंत सुरू राहील. सोने खरेदीचा एकूण कालावधी २१ तास ५९ मिनिटे असेल.

हे ही वाचा :

आजचे राशिभविष्य (२२ एप्रिल २०२३)

अक्षयतृतीयेनिमित्त बाजारात चैतन्य

Back to top button