honey trap: डीएसपीच्या अश्लिल व्हिडिओनंतर आता आणखी एक व्हिडिओ | पुढारी

honey trap: डीएसपीच्या अश्लिल व्हिडिओनंतर आता आणखी एक व्हिडिओ

जयपूर, पुढारी ऑनलाईन

जयपूरच्या एका अलिशान हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत वरिष्ठ पोलिस अधिकारी करत असलेल्या अश्लिल चाळ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजस्थानमध्ये ( honey trap )  खळबळ उडली होती. आता पुन्हा एकदा एका बँक अधिकाऱ्याच्या अश्लिल व्हिडिओमुळे जयपूरमध्ये खळबळ उडाली असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

जयपूरच्या एका हॉटेलमध्ये डीएसपी हिरालाल सैनी याने महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ समोर आला. या जोडप्यासोबत संबधित महिलेचा आठ वर्षांचा मुलगाही होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे. आता हे वादळ शमते न शमते तोच एका बँक अधिकाऱ्याचा अश्लिल व्हिडिओ चर्चेत आहे.

यपूर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एका अधिकाऱ्याला एका महिलेने जयपूरमधील एका हॉटेलमध्ये बोलविले. त्यावेळी संबधित महिलेने आपल्याला मोठी रक्कम बँकेत गुंतवायची आहे, असे सांगितले. बँकेचा अधिकारी हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याला बोलण्यात गुंगवून लैंगिक संबंध प्रस्थापित केले. या संबंधांचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला. त्यानंतर संबधित महिला या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करू लागली.

ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार संबधित महिला बँक अधिकाऱ्याला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होती. तसेच २० लाख रुपये दिले नाहीत तर बदनामी करू, असे धमकावत होती. ब्लॅकमेलिंगमुळे धास्तावलेल्या या अधिकाऱ्याने जयपूर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. सीमा उर्फ सपना शर्मा असे संबधित महिलेचे नाव आहे. खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ती महिला २० लाख रुपयांची मागणी करत होती.

honey trap : पैसे घेताना अटक

तक्रारदार अधिकाऱ्याने पोलिसांना काही ऑडिओ रेकॉर्ड आणि हार्ड डिस्क दिले. पोलिसांच्या सायबर सेलने संबधित अधिकारी आणि संशयित महिलेच्या मोबाईल क्रमांकाचे कॉल डिटेल्स काढले त्यानुसार संबधित महिलेचा शोध घेतला. जयपूरमधील एका ढाब्याजवळ पोलिसांनी सापळा लावला होता. त्यावेळी एक लाख रुपये स्वीकारताना संबधित महिलेला पोलिसांनी अटक केली. अधिक चौकशी केली असता याआधीही संबधित महिलेला दिल्ली आणि अलवरमध्ये हनी ट्रॅप प्रकरणात अटक करण्यात आली होती.

हेही वाचा : 

Back to top button