Goa : कोविड-लॉकडाऊननंतर गोव्यात पुन्हा एकदा हळूहळू फुलतंय पर्यटन! | पुढारी

Goa : कोविड-लॉकडाऊननंतर गोव्यात पुन्हा एकदा हळूहळू फुलतंय पर्यटन!

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मनाला भुरळ पडणारे अथांग असे समुद्रकिनारे, नेत्रदीपक चर्च, निसर्गरम्य वातावरण, विशिष्ट खाद्यसंस्कृती आणि आपुलकीने केलं जाणारं आतिथ्य यामुळे गोवा ( goa ) हा नेहमीच पर्यटकांसाठी प्रथम पर्याय असतो. गोव्याची अर्थव्यवस्थाही बहुतांशी पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र मागच्या दोन वर्षात कोविड विषाणूने सर्वत्रच सारीच गणिते बदलवून टाकली आहेत. गोव्याचा मुख्य व्यवसाय असणारा प्रयत्न व्यवसायही त्यामुळे थंड पडला होता.

Coal stock : कोल इंडियाकडे ४०० लाख टन कोळसा साठा, कोळसा मंत्रालयाचे स्पष्टीकरण

या विषाणूची दुसरी लाट संपते आहे म्हणता म्हणता तिसऱ्या लाटेच्या अफवा उठल्यामुळे मध्यंतरी गोव्यात येऊ पाहणारा परतक पुन्हा एकदा थांबला होता. मात्र आता जास्तीत जास्त लसीकरण करून आणि कोविड रुग्ण कमी होत असल्याची खरी करून घेत राज्यशासनाने काही नियम घालून पर्यटकांना गोव्यात येण्याची परवानगी देण्यास सुरुवात केली आहे.

दूधीच्या ज्यूसमुळे विषबाधा ; ‘या’ अभिनेत्याची पत्नी गेली आयसीयूत

ज्यांचे लसीकरणाचे दोंन्ही डोस पूर्ण झाले आहेत. आणि गोव्यात ( goa ) यायच्या ७२ तासांच्या आत ज्याचे आरटी- पीसीआर चाचणीचे अहवाल नकारात्मक आहेत. अशा नागरिकांना गोव्यात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोविड -शिष्टाचारांचे पालन करत पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरु करण्यात आला आहे. या धर्तीवर पर्यटकही पुन्हा गोव्याकडे वाळू लागले आहेत. गोव्यातील हॉटेल्स जवळजवळ ८० टक्के भरलेली दिसून येत आहेत. विविध पर्यटनस्थळांवरही कमी-अधिक प्रमाणात पर्यटक दिसून येत आहेत. लवकरच आंतराराष्ट्रीय पर्यटकांसाठीही गोवा खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या गोव्यातील लोकांमध्ये पुन्हा एकदा चांगल्या दिवसांची आशा निर्माण झाली आहे.

पैसे आमचे, मग प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का? केंद्राला हायकोर्टाची नोटीस

कोविड महामारी येण्याआधी गोव्यात नेहमीच पर्यटक दिसून येत होते. मात्र या महामारीचा लोकांच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे आता पर्यटनासाठी गोवा खुला झाला असला तरी पर्यटकांचे प्रमाण मात्र अर्धेच आहे. पण गोव्यात पर्यटक येत आहेत ही एक सकारात्मक गोष्ट आहे.
फ्रान्सिस गोन्साल्विस, पर्यटक मार्गदर्शक

Back to top button